Nimboli Ark : पिकांसाठी निंबोळी अर्काचा वापर करा; कीटकनाशक खर्चात होते 25 टक्के कपात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कीटकनाशकांची फवारणी (Nimboli Ark) वारंवार करावी लागते. कीटकनाशकांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा बराच खर्च वाढतो. हा उत्पादन खर्च टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काचा वापर करणे गरजेचे असते. त्याकरिता सध्याच्या रिकाम्या दिवसांमध्ये उन्हाळ्यातच निंबोळी गोळा (Nimboli Ark) करून ठेवण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

खर्चात 20-25 टक्क्यांपर्यंत बचत (Nimboli Ark For Crops)

पिकलेल्या व जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या (Nimboli Ark) गोळा करून, चांगल्या वाळवून, कोरड्या जागेत साठवाव्यात. 5 टक्के निंबोळी अर्काची 2 हेक्टर कपाशी, तूर, हरभरा पिकांवर दोनवेळा फवारणी केल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या खर्चात 20 ते 25 टक्क्यांपर्यंत बचत होते. तसेच पेरणीपूर्वी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी, बियाण्याची उगवण क्षमता 70 ते 80 टक्क्यांपर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे.

मिळते चांगले उत्पादन

निंबोळी अर्काच्या वापरामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून, चांगले उत्पादन मिळते. माती परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येईल. खत मात्रा उशिरा दिल्यास पिकांच्या उत्पादनात घट येते. मध्यम, खोल आणि उथळ जमिनीत पिकांची पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेऊन करावी. आणि या पिकांना गरजेनुसार निंबोळी अर्काचा वेळोवेळी वापर करावा, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

कसा तयार करतात निंबोळी अर्क?

5 किलो निंबोळया गोळा करून त्या सावलीत वाळवाव्यात आणि फवारणीच्या 1 दिवस अगोदर त्या कुटुन बारीक कराव्यात आणि 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजु घालावे. तसेच 200 ग्रॅम साबणाचा चुरा किंवा वॉशिंग पावडर 1 लिटर पाण्यात वेगळा भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लाकडी काठीने ते द्रावण दुधासारखे दिसेपर्यंत ढवळावे. द्रावण ढवळुन झाल्यावर निंबोळी अर्क स्वच्छ पातळ कापडाने गाळुन घ्यावे आणि त्यात साबनाचे द्रावण मिसळावे, अशा रीतीने निंबोळीचा 5 टक्के अर्क तयार होतो. हा सर्व अर्क 100 लिटर होईल एवढे पाणी टाकावे व फवारणीसाठी वापरावे.

निंबोळी अर्क वापरण्याचे फायदे

  • निंबोळी खर्च अत्यल्प असतो.
  • नैसर्गिक असल्याने प्रदूषण होत नाही.
  • निंबोळी अर्क बनवणे. हाताळने व वापरणे सोपे आहे.
  • घातक किडींना प्रतिबंध, नियंत्रित करीत असले तरी नैसर्गिक शत्रू, मित्र किटकांसाठी फारसे हानीकारक ठरत नाही.
  • रासायनिक कीटकनाशकांचा द्वारे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरणाचा समतोल टाळता येईल.
  • निंबोळी अर्क / पेंड वापरल्यामुळे जमिनीतील सुत्रकृमी, मुळे कुरतडणाऱ्या अळ्या नियंत्रित होतात.
error: Content is protected !!