Nira Devghar Project : नीरा देवघर प्रकल्पासाठी 3591 कोटींचा निधी मंजूर; या भागांना होणार फायदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नीरा देवघर सिंचन प्रकल्पास (Nira Devghar Project) केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली असून, त्यानुसार 3591.46 कोटी रुपयांचा निधी मंजूर (Nira Devghar Project ) करण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत समाजमाध्यमांवर पोस्ट करत दिली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार असून, भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस आदी भागांना याचा मोठा लाभ होणार आहे.

जलशक्ती मंत्रालयाने निधी मंजुरीचे पत्रक जारी केले असून, या प्रकल्पाअंतर्गत (Nira Devghar Project) शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जलवाहिनी टाकली जाणार आहे. या जलवाहिनीद्वारे 16 टीमएमसी पाणी दिले जाणार असल्याने सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. 13 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह खासदार रणजित निंबाळकर आणि केंद्रीय सचिवांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी पाहणी केली होती. यानंतर आता जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत प्रकल्पाच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र-राज्याच्या खर्चाचा वाटा (Nira Devghar Project 3,591 Crore Approved)

नीरा देवघर सिंचन प्रकल्पाच्या एकूण खर्चात केंद्र सरकार 60 टक्के तर राज्य सरकारकडून 40 टक्के वाटा उचलला जाणार आहे. ज्यात आता केंद्र सरकार आपला 60 टक्के हिस्सा म्हणजे 2340 कोटी रुपये पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेतून देणार आहे. तर राज्य सरकारने या प्रकल्पासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीला याआधीच मंजुरी दिली आहे.

‘या’ भागांना होणार फायदा

दरम्यान, या प्रकल्पाच्या निधीला अंतिम मान्यता मिळाल्याने या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, पंढरपूर या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे.

error: Content is protected !!