Nitin Gadkari : शेतकरी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित; नितीन गडकरींचे मोठे विधान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेले (Nitin Gadkari) शेतकरी आंदोलन (Farmers Protest) हे लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वात मुद्दा म्हणून समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर मोठ्या प्रमाणात राजनीतिक वक्तव्य केली जात आहे. अशातच आता राज्यातील भाजपचे जेष्ठ नेते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. दिल्लीत पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हटले आहे.

निवडणूक डोळ्यामोर ठेऊन आंदोलन (Nitin Gadkari On Farmers Protest)

सध्या होत असलेले शेतकरी आंदोलन हे 2020 मधील कृषी कायद्यांविरोधात झालेल्या आंदोलनाचा पुनरुच्चार आहे. त्यावेळी 2022 मधील पंजाबमधील विधानसभा निवडणुकी आधी असेच शेतकरी आंदोलन झाले होते. लोकसभा निवडणूक डोळ्यामोर ठेऊन, यावेळच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला येण्याबाबत घोषणा केली. मात्र, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना मागण्यांसाठी एकत्र जमल्यात. यावेळी शेतकऱ्यांनी किमान आधारभूत कायदा आणि शेतकरी कर्जमाफीसह अनेक मुद्दे लावून धरले आहेत. असेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे.

‘शेतकरी बीजेपीच्या बाजूने’

सध्या होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपवर काय परिणाम होणार? याबाबत बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे की, यावेळी शेतकरी कोणाच्या भूलथापांना बळी न पडता बीजेपीच्या बाजूने मतदान करतील. सध्याचे शेतकरी आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. केंद्रातील भाजप सरकारने आपल्या मागील दोन कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी आणि त्यांचे कल्याण होण्यासाठी बरेच महत्वाचे निर्णय घेतले आहे. 2020-21 मध्ये शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता भाजप सरकारने, त्यावेळी तीन कृषी कायदे मागे घेतले होते. असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून एकूण 400 हुन अधिक जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. आपल्याला पुन्हा एकदा 400 हुन जागांवर निवडून येत देशात भाजप सरकार स्थापन होईल, असा विश्वास असल्याचेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!