Nursery Subsidy : नर्सरी अनुदान मिळवण्यासाठी आत्ताच करा अर्ज; पहा… कधीपर्यंत आहे मुदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता नर्सरी (Nursery Subsidy) सुरु करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण रोपे पुरवत आहेत. या माध्यमातून हे तरुण मेहनतीच्या जोरावर नर्सरी उद्योगातून (Nursery Subsidy) कोट्यावधींची उलाढाल करत आहे. तुम्हीही नर्सरी सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत तरुणांना नर्सरी उद्योगासाठी अनुदान प्राप्तीसाठी अर्ज सुरु करण्यात आले आहे.

इतक्या लाभार्थ्यांची होणार निवड (Nursery Subsidy From Government)

या प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या सिताफळ, पेरु, संत्री, डाळिंब, चिकू, मोसंबी, आंबा, काजू, लिंबू, पडवळ, मिरची (हिरवी/लाल) व फुलपिके या निवडक फलोत्पादन पिकासाठी “रोपवाटीका उभारणी तसेच केळी, स्ट्रॉबेरी, पेरु, डाळिंब, फुलपिके या निवडक फलोत्पादन पिकासाठी “उती संवर्धन युनिट उभारणीसाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून स्वंतत्रपणे अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक लाभार्थ्यांकडून पात्र अर्जाचे मुल्यांकन करुन मुल्यांकन निकषांनुसार “रोपवाटीका उभारणीसाठीचे प्रथम 07 व “उती संवर्धन युनिट उभारणीसाठीचे प्रथम 02 लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहेत. निवड झालेल्या लाभार्थीना प्रकल्पांतर्गत मॅचिंग ग्रँट म्हणून अनुदानाच्या स्वरूपात रोपवाटीका उभारणीसाठी पात्र प्रकल्प किंमतीच्या अधिकतम 60 टक्केपर्यंत किंवा कमाल 60 लाख रुपये प्रति प्रकल्प यापैकी जे कमी असेल ते अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

11 जानेवारीपर्यंत मुदत

अर्ज करण्यासाठी या जाहिरातीद्वारे आवश्यक असणारे लाभार्थी निवडीची प्रक्रिया, पात्रता निकष, पात्र व अपात्र घटक, अर्थसहाय्याचे स्वरुप, लाभार्थीनिहाय विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष, कागदपत्रांची तपासणी सूची, विविध प्रपत्र इ. बाबतची माहिती महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुणे च्या www.magnetadb.com या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे अर्थात www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत राहील. या जाहिराती संदर्भात शुध्दीपत्रके ही केवळ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुणे व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे च्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जातील

error: Content is protected !!