Okra Varieties: भेंडीच्या ‘या’ सुधारित जाती देतात जास्त उत्पादनाची हमी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीची भेंडीची भाजी (Okra Varieties) वेगवेगळी जीवनसत्वे, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोहाने (Okra Nutrition) समृद्ध असते. भेंडीच्या सुधारित वाणांची योग्य वेळी लागवड शेतकर्‍यांना जास्त उत्पादन मिळवून देते. जाणून घेऊ या भेंडीच्या सुधारित जातींची (Okra Varieties) माहिती.

भेंडीच्या सुधारित जाती (Okra Varieties)

पुसा A-4 (Pusa A-4)- ही सुधारित जात मावा आणि तुडतुडे किडींना तसेच, हळद्या (Yellow Vein Mosaic) या विषाणूजन्य रोगाला देखील प्रतिरोधक आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची आणि किंचित हलकी रंगाची असतात. ही जात कमी चिकट देखील आहे. या जातीला पेरणीनंतर साधारण 15 दिवसांनी फळे येऊ लागतात.

परभणी क्रांती (Parbhani Kranti) ही जात (Okra Varieties) करपा, लीफ कर्ल, व हळद्या रोगास सहनशील आहे. बिया लावल्यानंतर सुमारे 50 दिवसांनी फळे येऊ लागतात. या जातीची भेंडी गडद हिरव्या रंगाची आणि 15-18 सें.मी. लांब आहे.

पंजाब-7 (Punjab-7) – ही सुधारित जात (Okra Varieties) हळद्या रोगास प्रतिरोधक आहे. भेंडीचा रंग हिरवा आणि मध्यम आकाराचा असतो. आणि बिया पेरल्यानंतर साधारण 55 दिवसांनी फळे दिसू लागतात.

अर्का अभय (Arka Abhay) – भेंडीची ही जात येलो वेन मोझॅक व्हायरस रोगापासून स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. या जातीची भेंडीची झाडे 120-150 सेमी उंच आणि अगदी सरळ असतात.

अर्का अनामिका (Arka Anamika) – ही जात पिवळ्या मोझॅक व्हायरसला प्रतिबंधित आहे. ही जात पसरट असून तिला अनेक शाखा देखील फुटतात. या जातीच्या भेंडीला लव नसून त्या मऊ असतात. हा वाण उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूसाठी योग्य आहे.

वर्षा उपहार (Varsha Upahar) – पिवळा मोझॅक विषाणू रोगास प्रतिरोधक हे वाण 90-120 सेमी उंच वाढतात.  पानांचा रंग गडद हिरवा असतो आणि पावसाळ्यात पेरणीनंतर सुमारे 40 दिवसांनी फुले दिसायला लागतात.

हिसार उन्नत (Hissar Unnat) – या जातीच्या भेंडीची झाडे 90-120 सेमी उंच आहेत, पावसाळा आणि उन्हाळी दोन्ही ऋतुसाठी योग्य आहेत. या जातीची भेंडी 46-47 दिवसांत तोडण्यासाठी तयार होते.

VRO-6 – भेंडीच्या या जातीला ‘काशी प्रगती’ या नावाने देखील ओळखतात. ही जात पिवळ्या मोझॅक विषाणू रोगास प्रतिरोधक आहे. या जातीची झाडे पावसाळ्यात 175 सेमी उंच वाढतात.  उन्हाळी हंगामात सुमारे 130 सें. मी. लांब वाढतात. या जातीला फुले लवकर येतात. पेरणीनंतर केवळ 38 दिवसांनी फुले दिसायला लागतात.

पुसा सावनी (Pusa Savani)- उन्हाळा आणि पावसाळ्यासाठी उपयुक्त, या जातीच्या भेंडीच्या झाडांची लांबी सुमारे 100-200 सेमी असते. फळे गडद हिरव्या रंगाची असतात. साधारणपणे या जातीला यलोवेन मोझॅक व्हायरस रोगाचाही त्रास होत नाही.

पुसा मखमली (Pusa Makhamali)- या जातीची (Okra Varieties) फळे हलक्या हिरव्या रंगाची असतात, परंतु ही जात पिवळ्या मोझॅक विषाणूला प्रतिरोधक नसते. या भेंडीच्या फळाला 5 पट्टे असून फळांची लांबी 12 ते 15 सें. मी. असते.

error: Content is protected !!