Onion Cultivation : आता कांदा लागवड करणे झाले सोपे; ‘ही’ मशीन करणार बियाणेचा कांदा लागवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात कांदा लागवड (Onion Cultivation) केली जाते. राज्यात नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असून, एकट्या नाशिक जिल्ह्यात राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी निम्माहून अधिक उत्पादन होते. मात्र, कांदा पीक घेताना शेतकऱ्यांना मजुरांची सर्वात मोठी समस्या असते. अगदी कांदा लागवड (Onion Cultivation) करण्यापासून ते कांदा काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात मजूर लागतात.

प्रामुख्याने शेतकऱ्यांना कांद्याचे बियाणे करताना देखील शेतकऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. मात्र, आता शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन, भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयसीएआर) कांदा उत्पादकांसाठी अत्याधुनिक कांदा लागवड (Onion Cultivation) मशीन तयार केली आहे. ही मशीन प्रामुख्याने शेतकऱ्यांना डोंगळे लावण्यासाठी अर्थात बियाणाच्या कांदा बेडवर लावण्यासाठी मदत करणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे.

काय आहे ही मशीन? (Onion Cultivation In India)

शेतकऱ्यांना कांदा पिकावरील उत्पादन खर्च कमी व्हावा. या उद्देशाने भारतीय कृषी संशोधन परिषदेने या यंत्राची निर्मिती केली आहे. प्रामुख्याने कांदा लागवड करताना शेतकरी प्रथमतः जानेवारी ते एप्रिल कांद्याचे बियाणे तयार करतात. त्यानंतर पावसाळा सुरु झाल्यानंतर कांद्याची रोपे तयार केली जातात. मात्र कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना, डिसेंबर-जानेवारी महिन्यात जमिन कुदळने खोदून मजुरांच्या साहाय्याने डोंगळे लावावे लागतात. मात्र आता या मशीनच्या मदतीने शेतकऱ्यांना मजुरांविना बियाण्याचा कांदा लावता येणार आहे.

कसे काम करते ही मशीन?

कृषी संशोधन संस्थेने कांदा लागवडीसाठीचे बनवलेले हे यंत्र ट्रॅक्टर आधारित बनवले आहे. ज्यामुळे कांदा लागवड करणे खूप आरामदायी होणार आहे. या मशीनला एक ट्रॅक्टरचलित बेल्ट देण्यात आला असून, जो सतत फिरत राहून कांदा लागवड करण्यास करण्यास मदत होते. प्रामुख्याने या मशीनला ४ टोके देण्यात आले असून, त्यातून बियाण्याचा कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना एक-एक कांदा असे करून एकावेळी चार कांदे सोडता येणार आहे. अर्थात या मशीनच्या मदतीने विशिष्ट अंतरावर डोंगळ्यांचे कांदा रोपन होऊन, बियाणे रोगमुक्त मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांचे कष्ट कमी होणार

प्रामुख्याने कांदा लागवड करण्यासाठी सर्व प्रकारची माती योग्य मानली जाते. त्यामुळे देशातील प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, ओडिसा, कर्नाटक, तामिळनाडु, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केले जाते. त्यामुळे आता या सर्व राज्यांमधील शेतकऱ्यांना या कांदा लागवड मशीनचा मोठा फायदा होणार आहे. प्रामुख्याने बियाणे तयार करतानाचे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!