Onion Cultivation : राज्यात कांदा लागवडीची लगबग! यावर्षी मिळणार चांगले दर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Cultivation : दरवर्षी राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. परंतु कांद्याला अजूनही पाहिजे तसे भाव मिळाले नाहीत. त्यामुळे सतत कांदा उत्पादक शेतकरीवर्ग अडचणीत सापडतो. परंतु यावर्षी राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षी कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असे झाले तर शेतकरीवर्गाला काहीसा दिलासा मिळू शकतो.

यावर्षी राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कांदा लागवडीला वेग आला आहे. दरम्यान, पावसामुळे बाजारात कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी कांद्याला चांगले भाव मिळू शकतात. लासलगाव कांदा बाजार समितीत २४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून सरासरी दर १ हजार ४०० रुपयांवर गेले आहेत. (Onion Cultivation)

दरम्यान, आतापर्यंत देशात १४ जुलैपर्यंत ३२ हजार हेक्टवर कांदा लागवड झाली असून गेल्या हंगामात याच काळात लागवड ३६ हजार हेक्टर इतकी झाली होती. यावर्षी सरकारकडून खरिपामध्ये ३ लाख ४१ हजार हेक्टरवर कांदा लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

इथे चेक करा कांद्याचे बाजारभाव –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कांद्याचा बाजारभाव पाहायचा असेल तर प्लेस्टोअरवर जाऊन लगेचच hello krushi हे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही रोजचे बाजारभाव चेक करू शकता. त्याचबरोबर, सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची मोफत माहिती मिळवू शकता त्यामुळे लगेचच हे अँप डाउनलोड करा

error: Content is protected !!