Onion Disease : कांदा पिकावरील ‘हा’ आहे सर्वात धोकादायक रोग; वाचा.. लक्षणे व उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन (Onion Disease) घेतले जाते. कांदा पिकाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अनेक औषध फवारण्या कराव्या लागतात. मात्र, कांदा पिकावरील रोग नियंत्रण करण्यात शेतकऱ्यांना अपेक्षित यश मिळत नाही. कांद्यावरील सर्व रोगांमध्ये पीळ रोग हा सर्वात धोकादायक रोग मानला जातो. कांदा लागवडीनंतरच्या पहिल्या टप्प्यात हा रोग आढळून येतो. ज्यामुळे लागवडीनंतर ऐन कांदा रोप पीक अवस्थेत पदार्पण करत असताना, कांद्यावर हा रोग दिसून येतो. परिणामी, एकरी उत्पादनात मोठी घट होण्यास हा रोग (Onion Disease) कारणीभूत ठरतो.

तिन्ही हंगामात कांदा लागवड (Onion Disease Twister Disease)

कांदा हे राज्यातील महत्त्वाचे पीक आहे. याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने वर्षातून तीन वेळा कांदा लागवड केली जाते. कांदा हा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांमध्ये (Onion Disease) वापरला जातो. कांद्यामध्ये अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म देखील आढळतात. त्यामुळे त्याची मागणी कायम आहे. उत्पादन थोडे कमी झाले की भाव वाढतात? मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रतिकूल हवामान आणि योग्य भाव न मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पीळ रोगाची लक्षणे

कांद्यावरील पीळ रोगाची (Onion Disease) सुरुवातीची लक्षणे म्हणजे पानांवर पिवळे ठिपके पडतात. जे पानाच्या संपूर्ण भागावर पसरतात. या रोगाला ट्विस्टर किंवा स्प्रिंग असेही म्हणतात. कोलेटोट्रिचम बुरशीचे फिलामेंटस जमिनीत वर्षानुवर्षे आणि प्रभावित पिकांच्या अवशेषांमध्ये महिने टिकून राहू शकतात. ज्यामुळे याचा संपूर्ण कांदा पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कांदा पिकावरील पीळ रोगाचे मुख्य कारण म्हणजे थ्रिप्स कीटक आहेत. कांदा पिकावर थ्रीप्स किडीचा प्रादुर्भाव असल्यास, हे थ्रिप्स कांद्याच्या मऊ भागांना संक्रमित करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी बुरशीची वाढ सुरू होते. आणि कांद्याच्या पिकावर पीळ रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

पीळ रोग नियंत्रणासाठीचे उपाय

  • कांदा पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी.
  • कांद्याचे प्रमाणित बियाणे वापरावे. ज्यामुळे रोग नियंत्रणास मदत होते.
  • 2 किंवा 3 वर्षांनी पिकांची आलटून पालटून लागवड करावी. ज्यामुळे जमिनीची उपयुक्तता टिकून राहते.
  • लागवड करताना रोपांच्या योग्य अंतरासाठी काळजी घ्या.
  • मातीची परिक्षणासह खतांचा योग्य वापर करावा.
  • कांदा लागवड करताना रोपांमध्ये योग्य अंतर ठेवावे.
  • रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून, प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून नष्ट करावीत.
  • शेतात प्रति एकर 8 ते 10 पिवळे चिकट सापळे आणि 8 ते 10 निळे चिकट सापळे लावावेत.
  • नियमित तण नियंत्रण करावे, जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
error: Content is protected !!