Onion Ethanol Ban : प्रसंगी दिल्लीला जाऊ….; कांदा, इथेनॉल प्रश्नी अजित पवारांची भूमिका!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट (Onion Ethanol Ban) करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र असे असतानाच आता सरकारकडून कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीवर बंदी (Onion Ethanol Ban) घालण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात आज विरोधकांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल बंदीचा (Onion Ethanol Ban) मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसकडून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनीही पाटील यांची बाजू लावून धरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यावर बोलताना म्हणाले, कांदा निर्यात, इथेनॉल निर्मिती वरील बंदी प्रश्नावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. कांदा निर्यात आणि इथेनॉल निर्मिती प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी गरज पडल्यास दिल्लीला जाऊन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढू. तसेच उद्या आपण इथेनॉल बंदीच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांचीही भेट घेणार आहोत.” असे पवार जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले आहे.

बैठक घेऊन तोडगा काढणार (Onion Ethanol Ban Ajit Pawar Statement)

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दूध व सोयाबीन दराचा मुद्दा लावून धरला. यावर बोलताना अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, “दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना वेळे अभावी बैठक घेणे शक्य नसल्यास, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आपण स्वत: दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह येत्या मंगळवारी बैठक घेऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी सभागृहाला दिला आहे.

error: Content is protected !!