Onion Export: भारताने श्रीलंका, यूएई येथे प्रत्येकी 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीला दिली परवानगी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: श्रीलंका, यूएईला प्रत्येकी 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यात (Onion Export) होणार.परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT), मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भारताने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये प्रत्येकी 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यात (Onion Export) करण्यास मान्यता दिली आहे.

‘यूएई’ ला अतिरिक्त निर्यात (Onion Export)

ही अतिरिक्त 10,000 टन कांद्याची निर्यात यूएईला (UAE) करण्यात येणार आहे. शिवाय यापूर्वी 24,400 टन कांद्याची निर्यात झाली होती. भारतातून कांद्याच्या निर्यातीवरील बंदी (Onion Export Ban) 8 डिसेंबर 2023 रोजी लागू करण्यात आली होती आणि ती 31 मार्च 2024 पर्यंत राहणार होती.

अनियमित हवामान (Weather Condition) आणि पुरवठ्याच्या समस्यांमुळे सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात कांद्याच्या निर्यातीवर मर्यादा लादल्या. तथापि, डीजीएफटी अधिसूचनेनुसार, इतर राष्ट्रांनी केलेल्या विनंत्या यामुळे केंद्र सरकारच्या (Central Government) परवानगीनेच कांदा निर्यातीला (Onion Export) परवानगी दिली जाईल.

कांद्याच्या वाढत्या किमतीला (Onion Rate) आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातून (Onion Buffer Stock) कांदा बाहेर काढला होता. सुरुवातीला, सरकारने 2023-24 हंगामासाठी 3 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक राखण्याचा मानस ठेवला होता, जो आधीच्या 2022-23 हंगामातील आरक्षित 2.51 लाख टनांपेक्षा अधिक होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या अलीकडील आकडेवारीनुसार, किरकोळ चलन वाढीचा दर मार्च मध्ये 4.85% या 10 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात  अन्नधान्य महागाईत (Food Inflation) वाढ 5.09% होता.

error: Content is protected !!