हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा निर्यातबंदीमुळे आक्रमक (Onion Export Ban) झाले असून, राज्यातील अनेक बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांनी (Onion Export Ban) आजपासून आपले कांदा लिलाव पूर्ववत सुरु केले असल्याचे सांगितले जात आहे. लासलगाव बाजार समितीने लिलाव सुरु करण्यात आल्याच्या सूचना आपल्या समाजमाध्यमाच्या अधिकृत पेजवर जारी केल्या आहेत.
राज्याच्या सहकार विभागाकडून जे व्यापारी लागोपाठ 3 दिवस लिलाव बंद ठेवतील. अशा व्यापाऱ्यांचे परवाने सरकारकडून रद्द (Onion Export Ban) केले जातील. असा सज्जड इशारा व्यापाऱ्यांना देण्यात आला होता. त्यामुळे आता राज्यासह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील विंचूर, मनमाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत आदीं बाजार समित्यांनी आपले कांदा लिलाव सुरू केले आहे. शनिवारी अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा थेट नाशिक बाजारात विक्रीसाठी आणला असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
काय दर मिळणार? (Onion Export Ban Onion Auction Starts In APMC)
मागील तीन ते चार दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प असल्याने कोट्यवधींची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र आता लिलाव सुरु करण्यात आल्याने आज बाजारामध्ये कांदयाला काय भाव मिळणार? याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. लासलगाव बाजार समितीने दुपारी १ वाजता कांद्याचा लिलाव सुरु होईल, असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. निर्यात बंदीची घोषणा लागू होताच राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव जवळपास एक रुपयांनी खाली घसरले होते. त्यामुळे आज काय भाव जाहीर होतो याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे.