Onion Export : उद्या दिल्लीला जाणार, तुम्ही तयार राहा; निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export) घेतल्याने आपल्या सर्वांना रस्त्यावर उतरावे लागले. रास्ता रोकोशिवाय दिल्लीला कळत नाही. मात्र आता दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल. आज आपण सरकारला संदेश दिला (Onion Export) असून, उद्या दिल्लीत जाऊन संसदेत शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे. चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा निर्यातबंदी विरोधातील रास्ता रोको आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलते होते.

शरद जोशींच्या आठवणींना उजाळा (Onion Export Sharad Pawar)

शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत न मिळणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. जेवणात कांदा आवश्यक आहे. प्रत्येक मसाल्यात कांद्याचा वापर होतो. परंतु कांद्याचे दर वाढताच निर्यात बंदी करणे हे कितपत योग्य? शेतकऱ्यांचा काही विचार करणार आहे की नाही? अशा शब्दात पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान अजून मिळालेले नाही. हे अनुदान देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यासाठी आपण उद्या दिल्लीला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आजच्या आंदोलनातून आपल्याला शेतकरी नेते शरद जोशी यांची आठवण झाल्याचेही ते यावेळी म्हणाले. शरद जोशी यांनी नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती उभी केली होती. त्यांनी शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवली आहे. तसाच इतिहास आपल्याला आता घडवायचा आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

तेव्हाही हेच लोक आले होते?

केंद्र सरकार आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसेल तर शेतकरी उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. 2009-10 मध्ये लोकसभेत भाजपच्या लोकांनी कांद्याच्या किंमती वाढल्या म्हणून गोंधळ घातला होता. भाजपचे लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून सभागृहात आले. त्यांनी कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी केली होती. लोकसभा अध्यक्षांनी मला सरकारच्या धोरणाबद्दल विचारले. तेव्हा आपण कांदा पिकवणारा शेतकरी लहान शेतकरी आहे. थोड्याश्या किंमती वाढल्या तर एवढा दंगा करण्याची गरज नाही. मी तेव्हा संसदेत ठणकावून सांगितले, परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, पण निर्यातबंदी केली नाही. अशी भूमिका घेतल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

तुम्ही तयार रहा…

चांदवडच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर सरकारकडून असे करु, तसे करु सांगितले जात आहे. शेतकरी हिताचे निर्णय कधी घेतले जात नाही. त्यामुळे आज जे काही आंदोलन आपण केले, यातून केंद्र सरकारने संदेश घ्यावा. मी उद्या संसदेत जाणार आहे, संबधीत लोकांना भेटणार. त्यातून काही हाती आले नाही तर तुम्ही तयार रहा, असे आवाहनही शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

error: Content is protected !!