Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे पाकिस्तानचा डबल फायदा; वाचा… नेमका कसा तो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत सरकारने देशातून कांदा बाहेर जाऊ नये. यामुळे निर्यात बंदीची (Onion Export Ban) घोषणा केली आहे. मात्र या निर्यात बंदीचा शेजारील देश असलेल्या पाकिस्तानला मोठा फायदा होत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या कांदा निर्यात मूल्यात 1200 यूएस डॉलर प्रत‍ि टनापर्यंत वाढ केली आहे. ज्यामुळे भारतीय कांदा निर्यात बंदीच्या दुप्पट फायदा पाकिस्तानला होत आहे. कांदा निर्यात मूल्यात (Onion Export Ban) वाढ करत आर्थिक फायदा तर दुसऱ्या बाजूने कांद्याची भारतीय पारंपरिक बाजारपेठ पाकिस्तानने स्वतःकडे ओढली आहे.

पाचही बोटे तुपात (Onion Export Ban Pakistan Double Gains)

कांदा व्यापारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, निर्यातबंदी केल्याने (Onion Export Ban) निर्यातदारांनी उभी केलेली संपूर्ण बाजारपेठ विचलित होते. पारंपरिक खरेदीदार देश हे अन्य पूरवठादार देशांसोबत निघून जातात. त्यामुळे पूर्णतः निर्यातबंदी करणे हे कोणत्याही व्यापारासाठी घातक असते. काही प्रमाणात निर्बंध लागू ठेवत निर्यात सुरु ठेवणे आवश्यक असते. असाच काहीसा प्रकार सध्या पाकिस्तान सोबत घडला आहे. भारतीय कांद्याची निर्यातबंदी पाकिस्तानच्या पथ्यावर पडली असून, पाकिस्तानी कांद्याचे महत्व वाढले आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तान सरकारने कांदा निर्यात मूल्यात भारी भरकम वाढ केली आहे. त्यामुळे भारतीय कांदा निर्यात बंदीचा दोन्ही बाजूने पाकिस्तानचा फायदा होत आहे.

बाजारपेठेवर पकड

श्रीलंका, बांग्लादेश, मलेश‍िया, सिंगापुर, मध्य-पूर्व आशियायी देश, नेपाळ आणि इंडोनेश‍िया हे भारताचे पारंपरिक कांदा आयात करणारे देश आहे. मात्र आता भारतीय कांदा देशाबाहेर जात नसल्याने या संपूर्ण बाजारपेठेवर पाकिस्तानची पकड निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाकिस्तानमधील कांदा पिकाखालील क्षेत्र वाढून, तेथील उत्पादनात मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

भारत जगातील सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश आहे. चीन दुसरा, हॉलंड तिसरा, पाकिस्तान चौथा आणि तुर्कस्तान पाचवा. हे पाच प्रमुख कांदा निर्यातदार देश आहेत. 2022-23 मध्ये भारताने एकूण 25,25,258 दशलक्ष टन कांदा निर्यात केला होता. ज्यातून देशाला 4,523 कोटींचे परकीय चलन मिळाले होते. उपलब्ध माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सध्या कांद्याचे दर 250 रुपये प्रत‍ि क‍िलो इतके आहेत. असे असतानाही पाकिस्तान सरकारने कांदा निर्यातबंदी न करता कांदा निर्यात मूल्यात वाढ केली आहे. जेणेकरून परकीय देशांना महागडा कांदा निर्यात करता येईल. याशिवाय स्थानिक शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळत आहे.

error: Content is protected !!