Onion Export : केंद्र सरकारकडून 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण (Onion Export) निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 31 मार्च 2024 पर्यंत देशाबाहेर कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी (Onion Export) घालण्यात आली आहे. त्यामुळे देशाबाहेर होणारी कांदा निर्यात पुढील चार महिन्यांसाठी पूर्णतः ठप्प असणार आहे. केंद्र सरकारच्या विदेश व्‍यापार महानिदेशालयाने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे.

कांदा निर्यात (Onion Export) धोरणात थोडा बदल करण्यात आला असून, त्यानुसार 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी घालण्यात येत आहे. याशिवाय साखरेच्या वाढत्या किमती लक्षात घेता उसापासून होणाऱ्या इथेनॉल निर्मितीस पूर्णतः बंदी घालण्यात येत आहे. त्यानुसार सर्व साखर कारखान्यांना आदेश जारी करण्यात येत आहे. अशा शब्दांत विदेश व्‍यापार महानिदेशालयाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

यापूर्वी असलेले निर्यात मूल्य (Onion Export Ban Central Government)

दरम्यान, यापूर्वी सरकारने कांदा निर्यात धोरणात बदल करत किमान निर्यात मूल्य लागू केले होते. त्यानुसार 29 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत कांदा निर्यात करण्यासाठी 800 डॉलर प्रति टन (40 टक्के) इतके मोठ्या प्रमाणात निर्यात मूल्य निर्धारित केले होते. भारतीय रुपयाचा विचार करता हे निर्यात मूल्य 66 हजार 706 रुपये प्रति टन इतक्या मोठ्या प्रमाणात निर्धारित करण्यात आले होते. ज्यामुळे नोव्हेंबर महिन्यात देशातील कांदा निर्यात ही 85 टक्क्यांनी घटल्याचे समोर आले होते. त्यातच आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी घातल्याने कांद्याची दरात मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केवळ या परिस्थितीत निर्यातीस सूट

विदेश व्‍यापार महानिदेशालयाने आपल्या पत्रकात स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, ‘सरकारने निर्यात बंदी लागू केल्याच्या दिनांकाअगोदर ज्या निर्यातदारांच्या शिपमेंट लोड झालेल्या असतील, किंवा यापूर्वी ज्यांचे निर्यात बिल मंजूर झाले आहे. याशिवाय ज्या शिपमेंटसाठीचे पेपर कस्टम विभागाकडे पाठवण्यात आले आहे. आणि ज्यांनी निर्यात पडताळणी कस्टम विभागाकडे प्रक्रिया सुरु केलेली असेल. केवळ या तीन परिस्थितींमध्येच कांदा निर्यात करण्यास सूट राहणार आहे. अर्थात सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्याअगोदर जे निर्यात सौदे झाले आहेत. तितका कांदा आता निर्यात होऊ शकणार आहे.

error: Content is protected !!