Onion Export : कांदाप्रश्नी फडणवीस-गोयल यांची बैठक; सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी (Onion Export) लागू केल्यानंतर, राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची याप्रश्नी (Onion Export) भेट घेतली आहे. काल (ता.9) संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या बैठकीत गोयल यांनी यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

फडणवीस यांचे निवेदन (Onion Export Fadnavis-Goyal Meeting)

निर्यात बंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी हा निर्णय मागे घ्यावा. यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतचे एक निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पियुष गोयल यांनी दिले आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे गोयल यांची भेट घेतली आहे. याबाबत ट्विट करताना फडणवीस म्हणाले आहे की, “शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न कांदा, कापूस व सोयाबीन या विषयांवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत एक सकारात्मक बैठक झाली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत मंत्री पियुष गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.”

सोमवारी दिल्लीत बैठक

दरम्यान, सोमवारी कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर दिल्ली येथे पियुष गोयल यांच्यासोबत एक बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिक जिल्ह्यातील निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह, काही व्यापारी, शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या बैठकीत कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याला आठवडा होतो कुठे नाही तर लगेचच कांदा निर्यातबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे.

error: Content is protected !!