Onion Export : नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक; लिलाव बंद पाडत मुंबई-आग्रा महामार्ग रोखला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची (Onion Export ) घोषणा केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला. तसेच जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद (Onion Export) पाडले. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार जिल्ह्यातील लासलगाव, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, येवला, उमराणे आणि अन्य बाजार पेठांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव होऊ दिले नाही.

लिलाव बंद पाडले (Onion Export Ban Farmers blocked highway)

अधिकृत माहितीनुसार, आज लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळपासूनच लिलाव बंद ठेवण्यात आला होता. मात्र जिल्ह्यातील विंचूर, निफाड या उपबाजार समित्यांमध्ये सुरु असलेले लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. तर मालेगाव परिसरातील उमराणे, मुंगसे, नांदगाव, चांदवड या बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी मालेगाव ते चांदवड या दरम्यान ठिकठिकाणी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला. शेतकऱ्यांना पोलिसांनी समज दिल्यानंतर आंदोलक शेतकरी शांतीपूर्ण मार्गाने काही काळानंतर पुन्हा वापस गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चांदवडमध्ये आंदोलनाला गालबोट लागल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी महामार्गावर एका तासाहून अधिक काळ आंदोलन सुरु राहिल्याने, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे.

दरामध्ये मोठी घसरण

मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सत्रामध्ये जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु असताना कांदा दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. विंचूर बाजार समितीमध्ये लिलाव सुरु असताना आज कांद्याला कमाल 3300 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बाजार समितीत कमाल 2880 ते किमान 900 रुपये तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल, मनमाड बाजार समितीत कमाल 3050 ते किमान 1000 ते सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल तर सायखेडा बाजार समितीत कमाल 2601 ते किमान 1000 रुपये तर सरासरी 2150 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण पाहायला मिळाली.

error: Content is protected !!