हॅलो कृषी ऑनलाईन : “देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. मात्र निर्यातीसाठी परवानगी दिल्यास तुटवडा (Onion Export) निर्माण होऊन अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गरज पडल्यास केंद्र सरकार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा कांदा खरेदी (Onion Export Ban) करण्यास तयार आहे.” असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी अचानक कांदा निर्यात बंदी (Onion Export) निर्णय लागू केला. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे आज हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला सळो की पळो सोडले. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत प्रश्नांच्या फैरी झाडल्या. या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून ही बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु यातून शेतकऱ्यांचे नुकसान सरकारकडून होऊ दिले जाणार नाही. आवशक्यता भासल्यास शेतकऱ्यांचा सर्व माल सरकार खरेदी करेल. आपले यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणे झाले आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
सरासरी 2000 रुपये दर (Onion Export Rate Drops In Maharashtra)
दरम्यान, आज (ता.11) लालसगाव बाजार समितीमध्ये लिलाव सुरु झाल्यानंतर कांदा दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. कांद्याला सरासरी 1900 ते 2000 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे पाहायला मिळत होते. आज लासलगाव बाजार समितीत कांद्याला कमाल 2611 रुपये किमान 1700 रुपये तर सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. दर घसरणीमुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.