Onion Export : नेपाळला चिनी कांदा आवडेना; भारताकडे कांदा पाठवण्यासाठी विनंती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export) निर्णय घेतल्याने शेजारील देशांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या निर्णयामुळे नेपाळसह शेजारील देशांमध्ये कांदा दरात मोठी वाढ झाली आहे. नेपाळ हा अन्नधान्यासह कांदा आणि अन्य भाजीपाल्यासाठी पूर्णतः भारतावर अवलंबून आहे. नेपाळ सरकारने भारत सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर चीनमधून कांदा मागवला. मात्र हा कांदा चवीला चांगला नसल्याने नेपाळकडून त्याची आयात थांबवण्यात आली असून, भारताकडे कांदा निर्यात पूर्ववत करण्यासाठी नेपाळ सरकारकडून विनंती (Onion Export) केली जाणार आहे. नेपाळ सरकारच्या उद्योग मंत्रालयाकडून अधिकृतरित्या भारत सरकारला ही विनंती करण्याबाबत स्थानिक वृत्तपत्रात म्हटले आहे.

नेपाळमधील आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळ सरकारच्या उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, भारतीय कांदा (Onion Export) व्यापाऱ्यांना विनंती करत, नेपाळ सरकार लवकरच भारत सरकारला कांदा निर्यातीसाठी राजी करणार आहे. भारतात गहू आणि तांदळावर निर्यात बंदी असताना देखील भारत सरकारकडून नेपाळला गहू आणि तांदळाची निर्यात सुरु आहे. अगदी त्याच पद्धतीने कांदा पुरवठा करण्यासाठी नेपाळ सरकार भारताला राजी करणार आहे. असे या अधिकाऱ्याने वृत्तात म्हटले आहे. 8 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये कांदा तुटवडा निर्माण झाला असून, दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी नेपाळ सरकार भारत सरकारला ही विनंती करणार आहे.

चिनी कांद्याला चव नाही (Onion Export Nepal Request To India)

भारतीय कांदा चिनी कांद्यापेक्षा महाग (Onion Export) असूनही, नेपाळी बाजारात लोकांची त्याला मोठी पसंती मिळत आहे. नेपाळ चीनकडून काही प्रमाणात कांदा मागवत आहे. मात्र त्या कांद्याला चव नसल्यामुळे ग्राहक त्याची खरेदी करण्यास नापसंती दर्शवत आहे. वृत्तात म्हटल्याप्रमाणे नेपाळी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, “चीनच्या कांद्याला चांगली चव नाही. त्यामुळे नेपाळी बाजारात ग्राहकांकडून चिनी कांद्याला मागणी नाही. नेपाळी ग्राहक जास्त किंमत देऊनही आपल्याकडील शिल्लक साठ्यातील भारतीय कांदा खरेदी करत आहे. त्यामुळे भारत सरकारने नेपाळ सरकारची विंनती मान्य न केल्यास नेपाळमध्ये मोठी कांदा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपाळने चीनकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात सुरु केलीही तरी दूरच्या वाहतुकीमुळे तो मिळण्यास विलंब होणार आहे.”

160 रुपये प्रति किलो दर

भारत सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मागील आठवड्यात नेपाळमध्ये एक किलो कांद्यासाठी ग्राहकांना 200 रुपये मोजावे लागत होते. मात्र नेपाळ सरकारने आपला राखीव कांदा साठा खुला केल्याने, हेच दर आता 160 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहे. सप्टेंबर 2019 मध्येही भारत सरकारने पूर्णतः कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही नेपाळमध्ये कांद्याचे दर प्रति किलो 250 रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले होते.

error: Content is protected !!