Onion Export : संयुक्त अरब अमिरातीला 10 हजार टन कांदा निर्यात होणार; अधिसूचना जारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 5 लाख टन कांदा खरेदी (Onion Export) करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. प्रामुख्याने देशातील राखीव साठ्यासाठी हा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अशातच आता संयुक्त अरब अमिराती (युएई) या पाश्चिमात्य देशाला 10 हजार टन कांदा निर्यातीस मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आज (ता.3) याबाबत अधिकृतपणे अधिसूचना जारी करत, संयुक्त अरब अमिराती या देशाला कांदा निर्यात (Onion Export) करण्यास परवानगी दिली आहे.

सरकारी संस्थेच्या मार्फत होणार निर्यात (Onion Export To UAE From India)

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनायाकडून जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेत म्हटले आहे की, संयुक्त अरब अमिराती (युएई) या देशाला केली जाणारी ही 10 हजार टन कांदा निर्यात (Onion Export) नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) या सरकारी संस्थेच्या मार्फत करण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वी मार्च महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने बांगलादेश या देशाला 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती. तर बांगलादेश सोबतच संयुक्त अरब अमिराती या देशाला 14,400 टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली होती. अशी एकूण 64,400 टन कांदा निर्यातीला यापूर्वी परवानगी देण्यात आली होती. त्यात आता या अधिसूचनेनंतर आणखी 10 हजार टन कांदा निर्यातीची भर पडणार आहे.

शेतकऱ्यांना फायदा नाहीच!

दरम्यान, इतक्या तुटपुंज्या स्वरुपात कांदा निर्यातीस परवानगी दिली जात असल्याने, त्याचा देशातील कांदा दरवाढ होण्यास कोणताही फायदा होत नाहीये. आजच्या निर्णयाचा विचार करता 10 हजार टन निर्यात ही देशातील एका बाजार समितीची सध्याची एका दिवसाची रोजची आवक आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट आहे. परिणामी, संपूर्णतः कांदा निर्यातबंदी हटवण्यात यावी, अशी मागणी तीन ते चार दिवसापूर्वी फळबाग निर्यातदार असोशिएशनकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.

error: Content is protected !!