Onion Farmers : कोण आहे किरण मोरे; जे कांदा उत्पादकांसाठी गावोगाव फिरताय; वाचा..!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी म्हटले की सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर (Onion Farmers) गावंढळ, अडाणी माणसाचे चित्र उभे राहते. मात्र, आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही. तो आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उभा राहत आहे. असेच काहीसे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एक सर्वसाधारण शेतकरी असलेल्या किरण मोरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला कांदा चित्र रथ, सध्या जिल्हाभरातील गावांमध्ये फिरतोय. विशेष म्हणजे किरण मोरे यांनी तयार केलेल्या या कांदा चित्ररथाची सध्या जिल्ह्यात सोशल मीडियावर (Onion Farmers) चांगलीच चर्चा रंगली आहे.

भित्तिचित्रे, व्यंगचित्रांमधून जनजागृती (Onion Farmers Kanda Chitra Ratha)

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ठेंगाडा गावातून शेतकरी किरण मोरे आणि केशव सूर्यवंशी यांनी या चित्र रथाची सुरुवात केली. शेतकरी किरण मोरे यांनी कार्टून क्षेत्रातील डिप्लोमा केला असून, ते उच्चशिक्षित आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्टून क्षेत्रातील ज्ञानाच्या जोरावर या कांदा चित्र रथाची (Onion Farmers) अप्रतिम रचना केली असून, त्याच्या चारही बाजूला भित्तिचित्रे लावण्यात आली आहे. ज्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी कसा भरडला गेला. याचे अप्रतिम वर्णन करत जनजागृती केली जात आहे. हा कांदा चित्ररथ पाहिल्यानंतर तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आपल्या चारही बाजूने लावलेल्या चित्रांद्वारे मांडतो.

‘शेतकऱ्यांना अडाणी समजू नका’

शेतकरी किरण मोरे सांगतात, “आपला राजकारणाशी काही एक संबंध नाही. मात्र, ज्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अशा सरकारचे चुकीचे धोरण शेतकऱ्यांसमोर मांडणे, हाच आपला या चित्ररथामागील उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजकाल शेतकऱ्याला अडचणी समजण्याची चूक सरकार करत आहे. मात्र शेतीमध्ये उच्चशिक्षित लोकांचे प्रमाण वाढले आहे. आपण स्वतः शिक्षण करताना वेगळा मार्ग निवडत, कार्टून क्षेत्रात डिप्लोमा केला आहे. आपल्या याच व्यंगचित्र आणि कार्टून शैलीतून आपण सध्या जिल्हाभर हा कांदा चित्र रथ काढला आहे.”

आतापर्यंत 25 गावांमध्ये फिरस्ती

किरण मोरे सांगतात, केशव सूर्यवंशी या मित्राच्या मदतीने आपण स्वखर्चाने हा कांदा चित्ररथ काढला असून, आतापर्यंत तो जिल्ह्यातील 25 गावांमध्ये पोहचला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत आपला हा रथ सर्व गावांमध्ये जाणार आहे. त्यानंतर सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Farmers) हटवली नाही. तर आपली दिल्लीला जाण्याची देखील तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या या कांदा चित्ररथाला सध्या सोशल माध्यमांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळत असून, गावागावात गेल्यानंतर शेतकरी समर्थन देत आहे. यावेळी सर्व शेतकरी, कांदा उत्पादकांचे दुःख सर्वांसमोर येण्यासाठी हा चित्र निर्यातबंदी हटवली जात नाही. तोपर्यंत सुरूच ठेवण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!