Onion Harvesting: अवकाळीच्या संकटामुळे कांदा काढणीला वेग!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिल्याने कांदा काढणीस (Onion Harvesting) वेग आलेला आहे. शेतकर्‍यांना कांद्याची शेती (Onion Farming) करताना मॉन्सूनची अनियमितता, त्यामुळे निर्माण झालेला दुष्काळ, कांदा रोपांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढलेले दर, भरमसाट मजुरी, विजेचा लपंडाव, कांदा निर्यात बंदी या सर्व समस्येला सामोरा जावे लागते. तरीही बळीराजाने चांगल्या दराच्या अपेक्षेने कांद्याची लागवड (Onion Cultivation) केली. या सर्व संकटावर मात करीत कांदा पीक काढण्यास आले असतानाच हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिल्याने शेतकरी सध्या भर उन्हात कांदा काढणीच्या (Onion Harvesting) कामात गुंतला आहे.

यंदाच्या रब्बी हंगामातील कांद्याला (Rabi Onion) लागवडीपासूनच अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. सर्व संकटांवर मात करीत कांदा पीक आजमितीला काढणीस आले आहे. त्यातच अवकाळीचे संकट आल्याने शेतकर्‍यांना लवकरात लवकर कांदा काढणी (Onion Harvesting) शिवाय पर्याय नाही. नाहीतर पावसाच्या तडाख्यात सापडून संपूर्ण पीक नष्ट होऊ शकते. शेतकर्‍यांसाठी इकडे आड तर तिकडे विहीर यासारखी परिस्थिती उद्भवली आहे.

उन्हाचा तडाखा वाढत असताना शेतकर्‍यांना कांदा काढावा लागत आहे. मागील वर्षी याच दिवसांत प्रचंड गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील कांदा पीक नेस्तनाबूत झाले होते. भांडवलसुद्धा निघाले नसल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका (Financial Loss) सहन करावा लागला होता. 

चालू वर्षी तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे सिंचनाचा प्रश्न (Irrigation Problem) निर्माण झाला आहे. बारमाही पाणी असलेल्या विहिरींनी मार्चच्या शेवटी तळ गाठण्यास सुरुवात केली. चालू हंगामात कांदा रोपांच्या टाकण्याच्या वेळी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. याचा परिणाम कांदा रोपांच्या (Onion Seedlings) उतरणीवर झाला.

यामुळे चालू रब्बी हंगामात कांदा रोपांचा (Onion Seed Shortage) प्रचंड तुटवडा निर्माण झाला. कांदा लागवड पूर्ण करण्यासाठी बळीराजांनी सोन्याच्या दरात कांदा रोप खरेदी करून कांदा लागवड केली. रोपांच्या अकल्पित टंचाईमुळे यंदाच्या हंगामात कांदा लागवड ही जानेवारी महिन्यापर्यंत सुरू होती (Onion Harvesting).

मजुरांची टंचाई (Labor Shortage)

पाणी टंचाई (Water Scarcity) व वाढत्या उन्हाच्या प्रकोपामुळे कांदा पि‍कावर करपा रोगाचा (Anthracnose Disease) प्रादुर्भाव वाढला असून, येणार्‍या उत्पादनात घट निर्माण झाली आहे. त्यातच जो कांदा काढणीस (Onion Harvesting) आला आहे. त्याची सर्वत्र काढणी सुरू आहे.

दरवर्षी बाहेरील मजूर कांदा काढणीसाठी (Onion Harvesting) डेरेदाखल होत असतात. यावर्षी सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत असल्याने मोठ्या प्रमाणावर मजूर हजेरी लावतील, असा अंदाज बळीराजांकडून बांधला जात होता; पण अद्याप पर्यंत पाहिजे त्या प्रमाणात मजूर उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

error: Content is protected !!