Onion Inspection : केंद्रीय पथकाकडून नाशिकमध्ये कांदा पाहणी; निर्यातबंदी हटवा, शेतकऱ्यांची मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाचा आढावा (Onion Inspection) घेण्यासाठी केंद्र सरकारचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे एक पथक सध्या राज्यात आले आहे. मंगळवारपासून (ता.६) या पथकाने जिल्ह्यातील दिंडोरी आणि कळवण तालुक्यातील कांदा पिकाचा आढावा घेतला. त्यामुळे कांद्याचे दर घसरलेले असताना केंद्राच्या पथकाचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या पथकामध्ये केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अप्पर सचिव मनोज कुमार आणि उपसंचालक पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखालील हे चार सदस्यीय पथक कांदा पिकाचा आढावा (Onion Inspection) घेत आहे.

भावातील घसरण सुरूच (Onion Inspection In Nashik)

एकीकडे हे केंद्रीय पथक नाशिकमधील कांदयाच्या परिस्थितीची पाहणी (Onion Inspection) करत असताना, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दर घसरणीची मालिका मात्र सुरूच आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांदा किमान ६००, कमाल १३००, तर सरासरी ११०० रुपये क्विंटल प्रति क्विंटलने विकला जात आहे. ज्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. दरम्यान, यापूर्वी ऑक्टोबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील केंद्रीय पथकाने कांदा पिकाच्या पाहणीचा दौरा केला होता. केंद्र सरकारच्या केंद्रीय पथकाचा हा राज्यातील कांदा पीक पाहणीचा आतापर्यंतचा तिसरा दौरा आहे.

निर्यातबंदी हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी

राज्य कृषी विभागाने केंद्र सरकारच्या पथकाच्या या दौऱ्याबाबत बोलताना म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पथकाने जिल्ह्यातील कांदा पीक, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे कांदा पिकावर झालेला परिणाम याचा आढावा. या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये घेतला. केंद्राच्या या पथकाने दिंडोरी आणि कळवण भागातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांसोबत कांदा पिकाबाबत चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी निर्यातबंदीनंतर कांदा दरात झालेल्या मोठ्या नुकसानीची माहिती पथकाला दिली. तसेच सरकारने कांदा पिकावरील निर्यातबंदी मागे घ्यावी. अशी कळकळीची विनंती या पथकाकडे केली आहे. त्यामुळे आता या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

उन्हाळी कांदा लागवड

यावेळी राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्रीय पथकाला नाशिक जिल्ह्यातील उन्हाळी कांद्याच्या लागवडीबाबत माहिती दिली आहे. यामध्ये मागील वर्षी जिल्ह्यात 2.23 लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड झाली होती. तर सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात आतापर्यंत 1.27 लाख हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवड झाला आहे. ज्यात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता असल्याचे राज्याच्या कृषी विभागाने म्हटले आहे. यावेळी केंद्रीय पथकासोबत नाशिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कळवण उपविभागीय कृषी अधिकारी आणि अन्य कृषी विभागातील अधिकारी देखील उपस्थित होते. तर या केंद्रीय पथकाने गुरुवारी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कांदा पिकाचा आढावा घेतला आहे.

error: Content is protected !!