Onion Market । नाफेडकडून अचानक कांदा खरेदी बंद, ‘या’ ठिकाणी घडला प्रकार; शेतकरी झाले आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Market । मागच्या काही दिवसापासून कांद्याने शेतकऱ्यांना चांगलेच रडविले आहे. आता कुठे चांगला भाव मिळाला सुरवात झाली होती. मात्र यानंतरही शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभा राहील आहे. नाफेडकडून सुरू झालेली कांदा खरेदी अचानक बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी कांदा भरून आणलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नेवासा (Nevasa) तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. १०) दुपारी चार वाजता देवगड फाटा येथील नाफेड खरेदी केंद्रावर आक्रमक होत राज्य शासनाचा जाहीर निषेध केला आहे. देवगड फाटा या ठिकाणी शुक्रवारपासून ७० ते ८० वाहने रांगेत उभी होती, मात्र नाफेडच्या वतीने अचानक कांदा खरेदी थांबवल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. (Onion Market)

नाफेडकडून वाहनातील कांदा खरेदी न केल्यामुळे कांद्याची वाहने रविवार पर्यंत खाली करून घेतली नाहीत. अचानक कांदा खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा मनःस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना नाफेडकडून कांदा खरेदीचा फायदा दिसून येत नाही.

कांदा खरेदी बंद झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. ३ ते ४ दिवस रांगेत उभी असलेली वाहने खाली करून न घेतल्याने शासनाची हेकेखोर वृत्ती समोर आली आहे, असे शेतकरी संघटनेचे नरेंद्र काळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

error: Content is protected !!