Onion Market Rate: कांद्याचे बाजार भाव 3 हजार पार, जाणून घ्या कुठे मिळाला विक्रमी भाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात (Onion Market Rate) वाढ होतांना दिसत आहे. रविवार 5 मे 2024 ला कांद्याच्या बाजारभावाने 3000 चा टप्पा पार केला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Election) सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडाला आहे. मात्र या निवडणुकीच्या काळात सर्वात जास्त गाजलेला मुद्दा म्हणजे कांदा निर्यात (Onion Export). केंद्र शासनाने डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत ही कांदा निर्यात बंदी (Onion Export Ban) लागू केली होती.

केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा बाजार भावात दबाव पाहायला मिळाला. डिसेंबर 2023 पासून कांद्याचे बाजार भाव (Onion Market Rate) दबावातच होते. पण, आता निवडणुकीच्या काळात कांद्याचा मुद्दा अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आहे.

पुन्हा एकदा कांदा निर्यात सुरू झाली आहे. दरम्यान सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर बाजारात मोठी सकारात्मकता पाहायला मिळत असून कांदा बाजार भावात (Onion Market Rate) गेल्या कित्येक महिन्यांनी पुन्हा एकदा तेजी दिसत आहे.

काल झालेल्या लिलावात राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याचे भाव 2500 पार गेले आहेत. तर काही ठिकाणी बाजार भाव आणि 3000 रुपयाचा टप्पा देखील पार केला आहे. काल रविवार असल्याने राज्यातील काही मोजक्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Bajar Samiti)  कांद्याचे लिलाव (Onion Auction) पूर्ण झाले आहेत.

या लिलावात मात्र कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Rate) सुधारणा झाली असल्याने शेतकर्‍यांमध्ये (Farmers) मोठे प्रसन्न वातावरण होते. दरम्यान, काल राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव? (Onion Market Rate)

जुन्नर-ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. किमान 1200, कमाल 3010 आणि सरासरी 2200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 2600 आणि सरासरी 1900असा भाव मिळाला आहे.

दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये कांद्याला किमान 700, कमाल 2600 आणि सरासरी 1800 असा भाव मिळाला आहे.

सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये कांद्याला किमान 1500, कमाल 2500 आणि सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान 400, कमाल 2500 आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लोकल कांद्याला किमान 700, कमाल 2300 आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे. कांदा बाजारभावात (Onion Market Rate) होणारी वाढ यामुळे शेतकरी समाधान आहे.

error: Content is protected !!