Onion Market Rate: कांदा बाजारभावात सुधारणा, जाणून घ्या वेगवेगळ्या बाजारातील भाव!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कांदा बाजारभावात (Onion Market Rate) काल काही प्रमाणात सुधारणा दिसून आलेली आहे.  

केंद्रातील सरकारने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी सहा देशांना कांदा निर्यातीस (Onion Export) परवानगी दिली आहे. बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा  देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत घेण्यात आलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासादायी ठरू शकतो अशी आशा व्यक्त होत आहे (Onion Market Rate) .

त्याआधी भारत सरकारने (Indian Government) 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा (White Onion) निर्यातीला परवानगी दिली होती. एकंदरीत आता देशातून एक लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा निर्यात करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळाली आहे.

अशातच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Growers) एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज राज्यातील काही बाजारांमध्ये (Bajar Samiti) कांदा बाजार भावात (Onion Market Rate) थोडीशी सुधारणा झालेली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला नेमका काय भाव (Onion Rate) मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वेगवेगळ्या बाजारपेठेत कांद्याचे भाव (Onion Market Rate)

कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये काल लोकल कांद्याला किमान 1500, कमाल 2500 आणि सरासरी पंधराशे रुपये असा भाव मिळाला आहे.

अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट: मिळालेल्या माहितीनुसार काल या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल 2200 आणि सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये काल लाल कांद्याला किमान 1000, कमाल 2100 आणि सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटाल असा दर मिळाला आहे.

चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये कांद्याला किमान एक हजार, कमाल 1850 आणि सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये कांद्याला किमान 400, कमाल 1990 रुपये आणि सरासरी 1451 रुपये असा भाव मिळाला आहे. मागील काही आठवडे कांद्याला जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळत होता, परंतु काल कांद्याच्या बाजारभावाने (Onion Market Rate) कमाल 2200 चा टप्पा गाठल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

error: Content is protected !!