निम्म्यापेक्षा जास्त कांदा वखारीमध्ये सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी हतबल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : मागच्या काही महिन्यापासून कांद्याचे दर खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहेत. उन्हाळी कांद्याचे दर आज ना उद्या वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा वखारी मध्ये साठवणूक करून ठेवला. दरम्यान नाशिकच्या कसमादे भागातील शेतकरी मागच्या चार महिन्यांपासून उन्हाळी कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. सध्या कांद्याला भाव मिळत नाही मात्र भविष्यात कांद्याचे भाव वाढतील या आशेने कांदा विकायचा का नाही अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सध्याच्या स्थितीचा विचार केला तर कांदा वखारीमध्ये सडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी चाळीतील कांदा बाहेर काढून त्यावर प्रत्येक प्रक्रिया करताना दिसत आहेत. सडलेला कांदा बाहेर काढून पुन्हा चाळीमध्ये साठवण्याचे काम चालू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील होत आहे. त्याचहाबरोअबर जास्त मेहनत अन् मजुरी देखील मोजावी लागत आहे. त्याचबरोबर कांद्याची प्रतवारी घसरून वजन देखील दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. (Onion Rate)

वखारीमध्ये जेवढा कांदा साठवून ठेवला होता त्यापेक्षा निम्मा देखील कांदा चांगला राहिलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यां समोर मोठे संकट उभा राहिले आहे. जर चांगल्या प्रकारे चा कांदा बाजारात विक्रीसाठी नेला तर त्याला योग्य भाव मिळत नाही अनचाळीतच ठेवला तर तो सोडू लागतो त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी समारंभ अवस्था निर्माण झाली आहे

‘या’ ठिकाणी चेक करा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर दररोज कांद्याचे भाव चेक करायचे असतील तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. आम्ही हे ॲप खास शेतकऱ्यांसाठीच बनवले आहे. त्यामुळे तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यामुळे लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा यामध्ये तुम्हाला शेतीविषयक अन्य माहिती मिळेल तीही अगदी मोफत

error: Content is protected !!