Onion Price : कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 600 रुपयांची घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गुरुवारी कांद्याच्या दरामध्ये (Onion Price) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात गुरुवारी कांद्याचे दर 2800 ते 5400 रुपये प्रति क्विंटलहून 2800 ते 4800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत. घाऊक बाजारात दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात अद्यापही कांद्याची विक्री ७५ ते ९० रुपये प्रति किलो या दराने होत आहे.

राज्यातील कांदा दरात (Onion Price) दररोज चढउतार पाहायला मिळत आहे. गेले दोन दिवस दर वाढू लागल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा कांदा दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तर शेतकरी मात्र चिंतेत आहे. सध्या सर्वत्र सणासुदीचा काळ सुरु आहे. अशावेळी कांद्याच्या किमतीत घसरण झाल्याने सर्वसामान्य जनता आनंदी आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सर्व पिकांचा रोजचा बाजारभाव घरबसल्या पाहायचा असेल तर आजच Hello Krushi अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये महाराष्ट्रातील सर्व पिकांचा रोजचा बाजारभाव अचूकपणे मिळत आहे . याशिवाय हॅलो कृषी मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, पशु खरेदी- विक्री यांसारख्या अनके सुविधा अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करा आणि सर्व सुविधांचा अचूकपणे लाभ घ्या.

कांद्याचे दर पुन्हा वाढणार का? (Onion Price)

गुरुवारी वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची 761 टन इतकी आवक झाली. मात्र बाजारात प्रतिक्विंटलमागे 600 रुपये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. किरकोळ बाजारातही कांदा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गेले दोन दिवस 80 ते 100 रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा गुरुवारी किरकोळ बाजारात 60 ते 75 रुपये प्रति किलोपर्यंत खाली घसरला. डिसेंबर महिन्यात नवीन कांदा बाजारात येईपर्यंत बाजारभावात असाच चढउतार सुरू राहील. सद्यस्थितीत कांदा दरात घसरण झाली असली तरी दर पुन्हा वाढू शकतात, असे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!