Onion Production : कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; बटाटा उत्पादनातही घट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 मध्ये देशातील कांदा उत्पादनात (Onion Production) मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात 254.73 लाख टन इतके कांदा उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 2022-23 मध्ये 302.08 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा उत्पादन 47.35 लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे. असे केंद्र सरकारने आपल्या सुधारित आकडेवारीत म्हटले आहे. त्यामुळे आता 31 मार्चनंतर देखील कांद्यावरील (Onion Production) निर्यातबंदी हटवली जाण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणवत आहे.

उन्हाळी कांदा भाव खाणार (Onion Production In India)

2023-24 मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात 34.31 लाख टन, कर्नाटकात 9.95 लाख टन, आंध्र प्रदेशात 3.54 लाख टन आणि राजस्थानात 3.12 लाख टनांनी कांदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर अलीकडेच राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील उन्हाळ कांदा लागवड 40 टक्क्यांनी घटली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाल कांद्याची आवक संपताच कांद्याच्या दरात हळूहळू पुन्हा वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे उन्हाळ कांदा चांगलाच भाव खाण्याची शक्यता आहे. एकूणच परिस्थिती पाहता सध्या तरी केंद्र सरकारचा कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा कोणताही विचार नसल्याचा सूर दिसून येत आहे.

बटाटा उत्पादनही घटले

इतकेच नाही तर 2023-24 या चालू वर्षात देशातील बटाटा उत्पादनात देखील मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षीच्या हंगामात देशात एकूण 589.94 लाख टन बटाटा उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या हंगामात एकूण 601.42 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी देशातील बटाटा उत्पादन 11.48 लाख टनांनी घटण्याची शक्यता असल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

फळे भाजीपाल्यातही अल्प घट

याशिवाय यावर्षी देशातील फळे आणि अन्य भाजीपाल्याचे उत्पादन चालू वर्षी 3552.5 लाख टन इतके होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या हंगामात एकूण 3554.8 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात फळे आणि भाजीपाल्याच्या लागवडीतही अल्प घट दिसून येणार आहे. त्यामुळे एकूणच यंदाचे वर्ष सर्वच कांदा, बटाट्यासह सर्व फळे आणि भाजीपाल्यासाठी घटीचे राहण्याची शक्यता अधिक आहे.

error: Content is protected !!