Onion Purchase : केंद्र सरकार 5 लाख टन कांदा खरेदी करणार; एनसीसीएफ अध्यक्ष्यांची माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यातबंदी (Onion Purchase) उठवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर 1 मॅट्रिक टन कांदा निर्यातीसाठी जवळपास 40 टक्के अर्थात 550 डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आले आहे. अशातच आता केंद्र सरकारकडून पाच लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत हा कांदा खरेदी केला जाणार आहे. अशी माहिती एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिंपळगाव बसवंत येथे माध्यमांना दिली आहे. यात प्रामुख्याने नाफेडकडून 2.5 लाख टन आणि एनसीसीएफसाठी 2.5 लाख टन कांदा खरेदी (Onion Purchase) केला जाणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

या ठिकाणाहून होणार खरेदी (Onion Purchase NAFED NCCF)

रब्बी खरेदी पीएसएफ-2024 साठी एफपीओएस आणि शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साठवण उपलब्धता आणि एनसीसीएफच्या टीमची खरेदीची तयारी तपासण्यासाठी विशाल सिंग पिंपळगाव बसवंत येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. येत्या जूनपर्यंत नाशिक, पुणे, हरयाणा आणि गुजरात येथून हा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे (Onion Purchase) उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

50 केंद्र उभारणार

कांदा खरेदी धोरणाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना त्यांचा कांदा जमा करता यावा. यासाठी सुरुवातीला सुमारे 50 केंद्र उघडणार आहे. शेतकऱ्यांसाठी पेमेंट यंत्रणा थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) करण्यात येणार आहे. 7 मेपासून खरेदी प्रक्रिया सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, निवडणूकीमुळे निर्यातबंदी उठवली असून, एनसीसीएफ व नाफेडमार्फत कांदा खरेदीतून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत भेट

पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याबाबत एनसीसीएफचे अध्यक्ष हे पिंपळगाव बसवंत येथे खरेदीची तयारी तपासण्यासाठी, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. मात्र, साडेबारा वाजताची वेळ दिलेली असताना काही शेतकरी माघारी फिरले आणि त्याठिकाणी फार्मर कंपन्यांचे पदाधिकारी आणि व्यापारीच उपस्थित होते.

error: Content is protected !!