Onion Purchase : शेतकऱ्यांकडून पाच लाख टन रब्बी कांदा खरेदी करणार; केंद्राची माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक (Onion Purchase) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. अशातच आता पुन्हा एकदा केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाकडून सरकारी कांदा खरेदीबाबत माहिती समोर आली आहे. ज्यात देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून पाच लाख टन रब्बी कांद्याची खरेदी (Onion Purchase) करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांबाबत सरकार गंभीर (Onion Purchase Five Lakh Tonnes From Farmers)

मागील आठवड्यात केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Purchase) 31 मार्च 2024 नंतर कायम राहणार असल्याचे म्हटले होते. ज्यामुळे आता केंद्रात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत अनिश्चित काळासाठी निर्यातबंदी कायम राहणार आहे. याबाबत बोलताना ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी म्हटले आहे की, केंद्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर असून, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडून एकूण पाच लाख टन रब्बी कांद्याची खरेदी सुरू करण्यात येणार आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी सरकारी पातळीवरून घेतली जात आहे.

दरवाढ होण्यास मदत मिळणार

राज्यात सध्याच्या घडीला बाजारात कांद्याला सरासरी 1100 ते 1300 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. मागील वर्षी या कालावधीत कांद्याला मिळत असलेले दर सध्याच्या दरांपेक्षा निम्म्याने कमी होते. अशातच आता राखीव साठ्यासाठी केंद्राकडून पाच लाख टन रब्बी कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. ज्यामुळे कांद्याच्या दरात काहीशी वाढ होण्यास मदत होणार आहे. मागील वर्षी याच कालावधीत केंद्र सरकारने एकूण 6.4 लाख टन रब्बी आणि खरीप दोन्ही कांद्यांची खरेदी केली होती.

एनसीसीएफमार्फत होणार खरेदी

केंद्राकडून केली जाणारी ही कांद्याची सरकारी खरेदी नॅशनल को-ऑपरेटिव्ह कॉन्समर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ) या नोडल एजन्सीमार्फत ही खरेदी केली जाणार आहे. मागील वर्षी केंद्र सरकारकडून जून महिन्यामध्ये सरकारी कांदा खरेदी सुरु केली होती. त्यातुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार असल्याने, केंद्र सरकारने राखीव साठ्यासाठी आधीच कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

error: Content is protected !!