Onion Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा 100 रुपये किलो; शेतकऱ्यांना 3 ते 15 रुपयांचा भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा राज्यातील कांदा उत्पादक (Onion Rate) शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अर्थात डिसेंबर महिन्यापासून कांदा निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे मागील चार महिन्यांपासून राज्यात कांदा 3 ते 15 रुपये प्रति किलो या पातळीत विकला जात आहे. याउलट आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कांदा जवळपास 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा दरात तेजी असूनही, तिचा राज्यासह देशातील शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक (Onion Rate) शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक (Onion Rate 100 Per Kg In International Market)

सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा कमाल 15 रुपये प्रति किलो (1500 रुपये क्विंटल) दराने (Onion Rate) विकला जात आहे. याउलट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक किलो उत्पादनासाठी 15 ते 20 रुपयांचा खर्च येतो. अर्थात उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कांदा शेती तोट्यात करावी लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. असेही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे.

महागाईला हातभार लावणारे मोकाट

केंद्र सरकारने महागाई कमी करण्याच्या नावाखाली सर्वप्रथम ऑगस्ट 2023 मध्ये कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले. त्यानंतर ते पुन्हा 800 डॉलर प्रत‍ि टनपर्यंत वाढवण्यात आले. पुढे 7 डिसेंबरच्या रात्री सरकारकडून निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला. ज्यास 31 मार्च 2024 नंतर देखील अन‍िश्च‍ितकाळासाठी कायम ठेवण्यात आला आहे. अर्थात शेतकऱ्यांना चोहीबाजूने कचाट्यात पकडले जात आहे.

मात्र, शेतकऱ्यांकडून 5 रुपये दराने खरेदी केलेला कांदा व्यापारी थेट 40 रुपये किलो दराने बाजारात विक्री करत आहे. अर्थात जे महागाईला हातभार लावत आहे. त्यांच्यासाठी सरकारकडून काहीही केले जात नाही. याउलट जो कष्टाने कांदा पिकवतो, त्यालाच फटका सहन करावा लागतो आहे. असेही भारत दिघोळे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!