Onion Rate : कांदा निर्यातीवरून शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन; केली ‘ही’ मोठी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Rate : मागच्या काही दिवसापासून कांद्याचे भाव शेतकऱ्यांना चांगलेच रडवत आहेत. यामुळे कांद्याला चांगला भाव मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना आहे. एकीकडे पाऊस पडत नाही आणि दुसरीकडे पिकाला योग्य भाव नाही यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. कांद्याच्या दराबाबत केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच कमालीचे घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. आता याच मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे.

काल शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणि शेतकऱ्यांनी राहुरी या ठिकाणी नगर मनमाड राज्य महामार्गावर झोपून चक्काजाम आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी सरकारने निर्णय घेतलेला तात्काळ रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.

कांद्याला किती बाजार भाव मिळतोय?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर घर बसल्या कांद्याचे बाजार भाव पाहिजे असतील तर लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. यामध्ये तुम्ही रोजचे रोज कांद्याचे बाजार भाव पाहू शकता. त्याचबरोबर इतर शेतमालाचे भाव देखील पाहू शकता. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज याची देखील माहिती तुम्ही या ॲपच्या माध्यमातून अगदी अचूकपणे पाहू शकता. त्यामुळे लगेचच हे आपले प्ले स्टोअरवर जाऊन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

कांद्याच्या दराबाबत शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कांद्याला सरसकट तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा त्याचबरोबर 31 मार्चपर्यंत जो कांदा खरेदी करण्यात आला आहे. त्या कांद्याला 350 रुपये अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत सरकार या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.

आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली त्यामुळे आता सरकार कायमच शेतकऱ्यांवर अन्याय करत असून शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये नाहीतर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा गंभीर इशारा रवींद्र मोरे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!