Onion Rate : राज्यात कांदा दोन हजाराच्या आत; आशियाई देशांमध्ये दुप्पट भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अलीकडेच कांदा निर्यात बंदीचा निर्यात (Onion Rate) निर्णय घेतला. त्यानंतर देशासह राज्यभरातील कांदा उत्पादक बाजार समित्यांमध्ये सातत्याने दरात घसरण सुरु आहे. दहा ते बारा दिवसांपूर्वी चार हजार रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा कांदा आज सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. मात्र देशासह महाराष्ट्रात कांदा दरात घसरण झालेली असताना अन्य आशियाई देशांमध्ये कांदा दर (Onion Rate) दुपटीने असल्याचे पाहायला मिळत आहे.

आशियाई देश हे कांद्यासाठी पूर्णतः भारतात अवलंबून आहेत. मात्र एकीकडे कांदा दरात घसरण (Onion Rate) झालेली असताना, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेशमध्ये कांदा दर दुपटीने वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दहा दिवसांत नेपाळमध्ये कांदा दरात दर दुप्पटीने वाढ झाली आहे. दहा दिवसांपूर्वी नेपाळमध्ये शंभर रुपये प्रतिकिलो मिळणार कांदा आता दोनशे रुपये किलोंवर गेला आहे. नेपाळने मागील आर्थिक वर्षांत 6.75 अब्ज रुपयांचा 190 टन कांदा आयात केला होता. नोव्हेंबर 2019 मध्येही भारताने कांदा निर्यात बंदी करताच किंमत 250 रुपये प्रती किलोवर गेली होती.

इथे पहा रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही तुम्हाला हव्या त्या शेतमालाचे रोजचे बाजारभाव अगदी सहज तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. हॅलो कृषी अँपवर शेतकरी आपल्या जवळच्या कोणत्याही बाजारसमितीमधील आजचे ताजे बाजारभाव पाहू शकतो. सोबत जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, शेतमालाची खरेदी विक्री करणे आदी सेवांचा लाभ घेता येतो.

अन्य देशांमध्येही दरवाढ (Onion Rate In Asian Countries)

श्रीलंकेतही भारताच्या निर्यात बंदीचा परिणाम कांदा दरांवर झाला आहे. कांद्याची किंमत 300 रुपये प्रती किलोवर गेली आहे. मालदीवसुद्धा कांद्याबाबत भारतावर अवलंबून आहे. मालदीवमध्ये 200 ते 350 रूफीया प्रती पॅकेट कांदा विकला जात होता. तो भारताने कांदा निर्यात बंदी करताच 500 रूफीया पॅकेटपासून 900 रूफीया पॅकेटपर्यंत पोहचला आहे. भूतानमध्ये 50 नगुल्ट्रम प्रती किलो कांदा विकला जात होता. भारताच्या निर्णयानंतर आता हा दर 150 नगुल्ट्रम प्रति किलोवर गेला आहे. बांगलादेशात कांदा 200 प्रती किलो टकावर गेला आहे. हा कांदा पूर्वी 130 टका प्रती किलोवर होता.

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

मात्र असे असतानाच केंद्र सरकारच्या निर्यातबंदी नंतर कांद्याच्या बाजारभावात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी बाजार भाव दोन हजार रुपयांच्या आत आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरण असताना निर्यात बंदीचा फटका अनेक देशांना बसला आहे.

error: Content is protected !!