Onion Rate : कांदा दरात मोठी घसरण; पहा तुमच्या बाजार समितीतील दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात (Onion Rate) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांत बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक वाढल्याने दरात (Onion Rate) जवळपास 450 रुपये प्रति क्विंटलची घसरण नोंदवली गेली आहे. मात्र असे असले तरी उन्हाळ कांद्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी (ता.24) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमाल 4201 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 3700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 4 हजार 350 क्विंटल इतकी लाल कांद्याची आवक शुक्रवारी बाजार समितीत नोंदवली गेली. याऊलट मंगळवारी (ता.21) बाजार समितीत लाल कांद्याला कमाल 4647 ते किमान 2752 तर सरासरी 4200 रुपये क्विंटल दर मिळाला होता. शुक्रवारी बाजारात समितीत 4 हजार 350 क्विंटल इतकी लाल कांद्याची आवक झाली आहे. जी मंगळवारी 1 हजार 818 क्विंटल इतकी नोंदवली गेली होती.

उन्हाळ कांद्याचे दर स्थिर (Onion Rate In Maharashtra)

मात्र असे असले तरी लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (ता.24) उन्हाळ कांद्याला कमाल 3 हजार 845 ते कमाल 2000 रुपये तर सरासरी 3 हजार 400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मंगळवारी (ता.21) उन्हाळी कांद्याला कमाल 3 हजार 847 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 3200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. शुक्रवारी बाजारात समितीत 9 हजार 032 क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे. जी मंगळवारी 9 हजार 486 क्विंटल इतकी नोंदवली गेली होती.

प्रमुख बाजार समित्यांमधील दर

राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील शुक्रवारचे लाल कांद्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत लाल कांद्याला कमाल 4353 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत कमाल 4400 ते सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल, उस्मानाबाद बाजार समितीत कमाल 4000 ते किमान 1000 तर सरासरी 2500 प्रति क्विंटल, जळगाव बाजार समितीत कमाल 3375 ते किमान 800 तर सरासरी 2375 रुपये प्रति क्विंटल, संगमनेर बाजार समितीत कमाल 3500 ते किमान 300 तर सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल, येवला बाजार समितीत कमाल 3726 ते किमान 1000 तर सरासरी 3150 रुपये प्रति क्विंटल, कोपरगाव बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 4000 ते किमान 2000 तर सरासरी 3450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

error: Content is protected !!