Onion Rate : शेतकऱ्यांचा स्वस्त कांदा, महाग होतोच कसा? वाचा मलिदयाचे संपूर्ण गणित!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यातबंदीनंतर कांदयाचे दर (Onion Rate) सरासरी 10 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहे. मात्र याउलट ग्राहकांना बाजारात 50 रुपये किलोने कांदा मिळतोय. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणात मलिदा खातंय कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज आपण कांदा विक्रीची (Onion Rate) शेतकऱ्यांना नडणारी ही साखळी आहे तरी कशी? याबाबतचे गणित समजून घेणार आहोत.

शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च (Onion Rate Farmers Getting 10 Rupees)

सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा दाम मिळत नाहीये. तर ग्राहकांना मात्र चढ्या दरात कांदा (Onion Rate) खरेदी करावा लागतोय. परिणामी, घाऊक बाजारातील कांदा, किरकोळ बाजारात जाईपर्यंत 50 रुपये कसा होतो? तर बाजार समित्यांमध्ये शेतकरी लिलावासाठी कांदा घेऊन येतात. शेतकऱ्यांना सध्या सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. एका ट्रॅक्टर किंवा पीक-अपमध्ये जवळपास 20 क्विंटल कांदा असतो. तो बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्यांना 2000 रुपये इतके गाडी भाडे लागते. त्यानंतर मलिदा खाण्याचा खरा खेळ सुरु होतो.

बाजार समितीतील खर्च

बाजार समित्यांमध्ये आडतदाराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्यानंतर त्यावर प्रति किलो 1 टक्के मार्केट फी लागते तर 4 टक्के आडत आकारली जाते. हे दोन्ही मिळून कांदा 10 रुपये 50 पैसे होतो. त्यानंतर आडतदाराकडून बारदाणी गोणीसाठी प्रति किलो 1 रुपये खर्च वाढतो. यानंतर कांदा लोडींगसाठी प्रति किलो 50 पैसे खर्च येतो. तर शेतकऱ्यांनी आणलेला कांदा प्रतिवारी करण्यासाठी आडत्याला त्यासाठीच्या मजुरीवर खर्च होतो. अर्थात मार्केटमधून ट्रक लोडींग होईलपर्यंत त्याच बाजार समितीत कांदा 15 रुपये प्रति किलो इतका होतो.

मधल्या फळीतील खर्च

दरम्यान, महाराष्ट्रातून 25 टनांची (250 क्व‍िंटल) एक गाडी उत्तर भारतीय शहरांमध्ये पाठवण्यासाठी जवळपास 80 हजार रुपये इतका वाहतूक खर्च होत असल्याचे सांगितले जाते. तिथूनही पुढे त्या-त्या भागात कांदा पाठवण्यासाठी जवळपास 3.20 रुपये प्रति किलो खर्च वाहतुकीवर होतो. तर स्थानिक बाजारात जाईपर्यंत कांदा 19.30 रुपये प्रति किलो होतो. वाहतुकीदरम्यान माल खराब होतो यासाठी व्यापारी तो खर्च त्यात समाविष्ट करतो. तो खर्च मिळून कांदा 20 रुपये 80 पैसे होतो. आता संपूर्ण 25 टनाची गाडी ही काही व्यापारी एका व्यक्तीला विक्री करत नाही. जवळपास 10 किरकोळ बाजारातील मोठ्या व्यापाऱ्यांना हा कांदा विकला जातो. त्यामुळे खरेदीदार व्यापारी त्यावर 2 रुपये प्रति किलोचे मार्जिन लावतो. अर्थात मोठ्या व्यापाऱ्यांपर्यत कांदा जाईपर्यंतच कांदा 23 रुपये प्रति किलो इतका होतो.

50 रुपये किलो का?

या मोठ्या व्यापाऱ्यांकडून किरकोळ बाजारातील मोठ्या व्यापाऱ्यांना यातील 100 किलो कांदा विकला (Onion Rate) जातो. त्यावर किरकोळ बाजारातील मोठे व्यापारी हे आपला 4-5 रुपये क‍िलो मार्जिन लावतात. तेव्हा कांद्याचा दर 27-28 रुपये किलोपर्यत पोहचतो. हेच व्यापारी आपल्या जवळच्या बाजारांमध्ये हा कांदा विकत असतील तर त्यावर 10 रुपये अधिकचे मार्जिन लावतात. त्यामुळे कांदा 35 ते 40 रुपये किलो होतो. त्यानंतर या व्यापाऱ्यांकडून 20 ते 25 किलो कांदा घेऊन किरकोळ विक्रते कांदा विक्री करतात. जे आपल्या विक्रीवर 10 रुपये प्रति किलो मार्जिन लावतात. त्यामुळे या पूर्ण साखळीमुळे शेतकरी मात्र नाडला जात आहे आणि कांदा मात्र 50 रुपये किलो विकला जात आहे.

error: Content is protected !!