हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात (Onion Rate) काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आता या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात कांद्याच्या दरात (Onion Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता.28) नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे दर 5 हजार रुपये प्रति क्विंटलच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे पाहायला मिळाले. पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळी कांदयाला कमाल 4900 ते किमान 2200 तर सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर लाल कांद्याला कमाल 4791 ते किमान 2000 तर सरासरी 4100 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे.
याशिवाय लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत 600 रुपये प्रति क्विंटलची वाढ नोंदवली गेली आहे. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला (Onion Rate) कमाल 4600 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 4200 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर लाल कांद्याला कमाल 4512 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 4150 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. दरम्यान, मागील आठवड्यात राज्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमधील कांद्याचे दर 4000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरले होते. दरम्यान, किरकोळ बाजारात कांद्याची विक्री 70 रुपये प्रति किलोने करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
अवकाळीमुळे दरात तेजी (Onion Rate Increases After Unseasonal Rain)
अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा दर तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील मंगळवारचे कांद्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. कळवण बाजार समितीत उन्हाळी कांद्याला कमाल 4850 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 4100 रुपये प्रति क्विंटल, चांदवड बाजार उन्हाळी कांद्याला कमाल 4570 ते किमान 900 रुपये तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल, विंचूर बाजार समितीत लाल कांद्याला कमाल 4500 ते किमान 2100 रुपये तर सरासरी 4100 रुपये प्रति क्विंटल, मनमाड बाजार समितीत लाल कांद्याला कमाल 4500 ते किमान 1052 तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल तर उमराणे बाजार समितीत उन्हाळी कांद्याला कमाल 4390 ते किमान 1001 रुपये तर सरासरी 3980 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.