Onion Rate : या जिल्ह्यामध्ये कांद्याला मिळतोय चांगला भाव; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Rate : मागच्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कांद्याला म्हणावा असा भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहेत. सरकारने अनुदानाची घोषणा केली मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर कांद्याचे अनुदान जमा झाले नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. शेतात इतर गोष्टींची पेरणी करण्यासाठी पैसे लागतात मात्र हे पैसे आणायचे कुठून अजूनही कांदा अनुदान बँक खात्यामध्ये जमा झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

सध्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यासह अन्य बाजार समितीत कांद्याची आवक सुरूच आहे. शनिवारी झालेल्या लिलावात नगर आणि संगमनेर बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये काहीही सुधारणा झाल्याची पाहायला मिळाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कांदादराबाबत पाहिले तर सध्या अहमदनगर जिल्ह्यात एक नंबरच्या कांद्याला २ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नगर जिल्ह्यामध्ये कांदा दरात चढ उतार होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कांदा दरात सुधारणा होईल अशा आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा वखारीमध्ये साठवून ठेवला आहे. मात्र म्हणावा तसा दर अजूनही मिळत नाही.

दरम्यान, शनिवारी झालेल्या लिलावात मात्र प्रतिक्विंटल मध्ये शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा झाल्याची पहायला मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

अहमदनगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी जवळपास ७८ हजारगोण्यांची आवक झाली. यावेळी एक नंबरच्या कांद्याला १७०० ते २१०० रुपयापर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला तर दोन नंबरच्या कांद्याला ११०० ते १७०० रुपये असा दर मिळाला आणि तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते १०० रुपयापर्यंत दर मिळाला. कांद्याच्या दरातील ही झालेली काहीही सुधारणा शेतकऱ्यांसाठी दिलासदायक आहे . कारण की इथून मागे कांद्याचे दर एकदम स्थिर होते मात्र आता आगामी काळात कांद्याचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कांद्याच्या दरात सुधारणा

नगर बरोबरच संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती देखील एक नंबर कांद्याला किमान १६०० ते कमाल २००० रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला आहे. त्याचबरोबर दोन नंबर कांद्याला १२०० ते १५०० आणि तीन नंबर कांद्याला ८०० ते १०० रुपये बाजार भाव मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या ठिकाणी पहा कांद्याचे अचूक बाजार भाव

शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. मात्र कोणत्या दिवशी कांद्याला किती भाव मिळतोय हे जर तुम्हाला अचूक पद्धतीने पाहिजे असेल तर आत्ताच Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा. यामध्ये तुम्ही बाजारभाव या ठिकाणी जाऊन कांद्याचे दर अगदी अचूकपणे पाहू शकता. कांद्याचे दरच नव्हे तर तुम्ही इतर पालेभाज्या किंवा इतर शेतमालाचे देखील दर यामध्ये पाहू शकता तेही अगदी मोफत. त्यामुळे प्लेस्टोर वर जाऊन लगेचच Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/08/2023
कोल्हापूरक्विंटल561360020001300
अकोलाक्विंटल774100016001500
औरंगाबादक्विंटल23143001550925
चंद्रपूर – गंजवडक्विंटल234140027002200
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल14579130020001650
मंचर- वणीक्विंटल419140021101755
साताराक्विंटल8980017001250
हिंगणाक्विंटल2170017001700
कराडहालवाक्विंटल15030017001700
सोलापूरलालक्विंटल991010025001050
बारामतीलालक्विंटल35925015501150
धुळेलालक्विंटल242820018001200
जळगावलालक्विंटल41262516501075
नागपूरलालक्विंटल2000100016001450
पेनलालक्विंटल363260028002600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल366120033002250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल267550020001250
पुणेलोकलक्विंटल979780019001350
पुणे- खडकीलोकलक्विंटल5100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2160016001100
पुणे-मांजरीलोकलक्विंटल114150018001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल2316001200900
कामठीलोकलक्विंटल22120016001400
कल्याणनं. १क्विंटल3180020001900
नागपूरपांढराक्विंटल1360200026002450
येवलाउन्हाळीक्विंटल1400040020001700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल700040020251750
नाशिकउन्हाळीक्विंटल388560022521450
लासलगावउन्हाळीक्विंटल1909270020951725
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल250050022001811
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल21000100021001775
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2000060020001800
सिन्नरउन्हाळीक्विंटल208030018471650
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल71350019811800
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल911710021001200
संगमनेरउन्हाळीक्विंटल566820026001400
मनमाडउन्हाळीक्विंटल500040019901550
सटाणाउन्हाळीक्विंटल1635055021551750
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2300050024001900
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल674040019201650
वैजापूरउन्हाळीक्विंटल334075025001600
देवळाउन्हाळीक्विंटल900030022511750
उमराणेउन्हाळीक्विंटल1650085021211700
error: Content is protected !!