Onion Rate : कांद्याला भाव मिळेल, कराव्या लागतील ‘या’ गोष्टी; वाचा पवार समितीच्या शिफारशी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजारात समित्यांमध्ये कांदा (Onion Rate) उत्पादक शेतकऱ्यांना सध्या 1 रुपये, 2 रुपये प्रति किलो दराने कांदा विक्री करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्याच्या दरामध्ये शेतकऱ्यांना पिकाचा उत्पादन खर्चही मिळणे अवघड झाले आहे. अशातच आता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे (Onion Rate) ऑनलाईन ई-लिलाव सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे.

पवार समितीची मुख्य शिफारस (Onion Rate Sunil Pawar Committee)

राज्य सरकारच्या वतीने कांदा उत्पादकांच्या (Onion Rate) समस्या सोडवण्यासाठी माजी पणन संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केंद्र सरकारच्या ई-नाम किंवा ई-ट्रेडिंग योजनेची अंमलबजावणी सुरू करावी, अशी शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरून आता बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन कांदा विक्री सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ऑनलाईन कांदा खरेदी-विक्रीची मागणी

दरम्यान सध्याच्या घडीला देशातील 1361 बाजार समित्या ई-नाम प्रणालीसोबत जोडल्या गेल्या आहे. यात महाराष्ट्रातील केवळ 118 बाजार समित्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच बाजार ऑनलाईन ई-नाम प्रणालीद्वारे कांदा खरेदी-विक्री व्यवहार सुरु करावा. ज्यामुळे कांदा विक्रीत पारदर्शकता येऊन, शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास देखील मदत होईल. असे सुनील पवार समितीच्या शिफारशींमध्ये म्हटले आहे. याशिवाय यामुळे बाजार समित्यांमध्ये शेतकरी, व्यापारी, आडतदार यांच्यामध्ये समन्वय साधण्यास देखील मदत होईल, असेही समितीने शिफारशींमध्ये म्हटले आहे.

सुनील पवार समितीच्या इतर शिफारशी

१. निर्यातीतील अडथळे दूर करावेत.
२. कांदा काढणीच्या काळात निर्यात सुरुच असावी.
३. कांदा निर्यातीबाबत धोरण ठरताना ते परिस्थिती अनुसार असावे.
४. इतकेच नाही तर भारतीय कांदा निर्यातबंदीमुळे भारतीय कांदा खरेदीदार देशांची बाजारपेठ इतर देशांकडे वळती झाल्याचे निरीक्षणही समितीने नोंदवले आहे.

काय आहे ई-नाम प्रणाली?

राष्ट्रीय कृषि बाजार योजना अर्थात ई-नाम प्रणाली (E-NAM Scheme) ही देशातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करण्यासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाइन मार्केटप्लेस प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये नोंदणी शेतकरी आपला शेतमाल थेट ऑनलाईन पद्धतीने जवळच्या बाजार समित्यांना विक्री करू शकतात. या प्रणालीच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशातील शेतकरी, व्यापारी, आणि खरेदीदारांना एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित असून, शेतकरी त्यावर आपला माल ऑनलाईन पद्धतीने विक्री करू शकतात. ज्यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन, शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य दर मिळण्यास मदत होते.

error: Content is protected !!