Onion Rate : कांदा दरात सुधारणा; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यातबंदीमुळे सध्या कांद्याचा प्रश्न (Onion Rate) तापला आहे. अशातच आता 31 मार्चनंतरही कांद्याची निर्यातबंदी कायम असणार आहे. मात्र, दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांदा देशातील राखीव साठ्यासाठी खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आज कांदा दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यात कांद्याला किमान भाव 1, 2 रुपये प्रति किलोचा भाव मिळत होता. मात्र, आज कांद्याला समित्यांमध्ये किमान 5 ते 12 रुपये किलोपर्यंत दर (Onion Rate) मिळाला आहे.

कमाल 23 रुपये प्रत‍ि किलोचा दर (Onion Rate Today 28 March 2024)

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला आज सर्वाधिक 23 रुपये प्रत‍ि किलोचा दर (Onion Rate) मिळाला आहे. तर सरासरी कांद्याला 15 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर शेतकऱ्यांना किमान 30 रुपये किलो भाव मिळाला असता. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. आणखी किती दिवस शेतकरी तोट्यात शेती करत राहणार? असा सवाल महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.

निवडणुकीसाठी कांदा खरेदी

सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा रोष (Onion Rate) कमी व्हावा. तसेच शेतकऱ्यांची मते मिळविण्यासाठी कांदा खरेदीचा निर्णय घेतला जात आहे. ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, अशा लोकांना धडा कसा शिकवायचा? याबाबत रणनीती बनवण्याचे काम संघटनेची कोअर कमिटी करत आहे. असेही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

आजचे राज्यातील कांदा बाजारभाव

सोलापूर बाजार समितीत आज 14776 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2300 ते किमान 200 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज 16255 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1800 ते किमान 400 रुपये तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल, चांदवड बाजार समितीत आज 5200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1625 ते किमान 1212 रुपये तर सरासरी 1550 रुपये प्रति क्विंटल, कळवण बाजार समितीत आज 7200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1650 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

लासलगाव बाजार समितीत आज 9436 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1632 ते किमान 700 रुपये तर सरासरी 1570 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज 8521 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1701 ते किमान 400 रुपये तर सरासरी 1601 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत आज 9812 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1700 ते किमान 1200 रुपये तर सरासरी 1450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

error: Content is protected !!