Onion Rate : मागच्या वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मागच्या वर्षी कांद्याचे बाजार भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः कांदा फेकून दिला होता. यावर्षी देखील तीच परिस्थिती दिसत आहे. बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. यामध्येच केंद्र सरकारने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावले होते. मात्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा २,४१० रुपये प्रतिक्विंटल कांडा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असून देखील कांद्याच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळत आहे. अहमदनगर, राहुरी, घोडेगाव बाजार समितीमध्ये 40% निर्यात शुल्काच्या निर्यातीनंतर कांद्याचे दर 300 ते 400 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. इथून पुढे कांदा शेतामध्ये पिकवावा का नाही? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कांद्याचे घसरलेले भाव पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलने देखील होत आहेत.
माहितीनुसार, निर्यात कर वाढीच्या निर्णयापूर्वी शेतकऱ्यांच्या कांद्याला 200 रुपयांपासून कमाल 2800 रुपयांपर्यंत आणि सरासरी 1400 ते 1700 रुपये दर मिळत होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे दर घसरल्याचे पाहायला मिळत आहे. कोपरगाव बाजार समितीसह इतर बाजार समितीमध्ये देखील 50% आवक कमी झाली आहे.
या ठिकाणी पाहता येतील कांद्याचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो तुम्हाला दर दररोजच्या दररोज कांद्याचे बाजार भाव पाहिजे असतील तर लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा; या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रोजचे कांद्याचे बाजार भाव पाहू शकतात. त्याचबरोबर इतर शेतमालाचे देखील बाजार भाव तुम्हाला पाहायला मिळतील . आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी योजना, सातबारा उतारा, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री, हवामान अंदाज, या गोष्टींची देखील माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून अगदी मोफत मिळेल. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. अनेक शेतकरी याचा फायदा घेत आहेत तुम्ही देखील याचा फायदा घ्यावा.
दरम्यान, शुक्रवारी कांद्याला 200 रुपयांपासून 2900 रुपयांपर्यंत दर मिळाले होते. यावेळी शेतकऱ्यांमध्ये थोडेफार समाधानकारक वातावरण पाहायला मिळत होते. मात्र नंतर शनिवारी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय लागू झाल्यानंतर हा दर 2500 रुपयांवर आला आहे त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या दरात घसरण झाली तर शेतकऱ्यांवर मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.