Onion Rath Yatra : आमच्याच उरावर का बसताय? सरकारी धोरणाविरोधात कांदा उत्पादकांची रथयात्रा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या धोरणांना कंटाळलेल्या नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रथयात्रा (Onion Rath Yatra) काढली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांना झालेला आर्थिक फटका समोर आणणे. हा या रथयात्रेचा मुख्य उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही कांदा रथयात्रा सुरु केली असून, ती जिल्ह्यातील गावागावांमध्ये जाऊन कांदा उत्पादकांची विदारक परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. असे कांदा रथयात्रेचे (Onion Rath Yatra) आयोजन करणाऱ्या केशव सूर्यवंशी या एका शेतकऱ्याने म्हटले आहे.

सरकारी हस्तक्षेपामुळे कष्टाची माती (Onion Rath Yatra Nashik Farmers)

केंद्र सरकारकडून काही विशिष्ट मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी, शेतकऱ्यांना पायदळी तुडवले जात आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान झालेल्या कांदा (Onion Rath Yatra) उत्पादक शेतकऱ्यांचे जीवन पूर्णतः प्रभावित झाले आहे. हीच गोष्ट ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लक्षात आणून देण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आली आली असल्याचे केशव सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. सरकार कांदा उत्पादकांच्याच का उरावर बसतंय? असा खोचक सवाल देखील या रथयात्रेच्या माध्यमातून विचारला जात आहे. हा कांदा रथ गावागावात जाऊन चौकात उभे राहत, सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा माहिती देतो. यावेळी रथयात्रेद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. पीक हाती येताच सरकारी हस्तक्षेपामुळे कांदा पिकाची माती होत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.

निर्यात बंदी पूर्णतः उठवावी

केंद्र सरकारने जवळपास मागील तीन महिन्यांपासून कांदा निर्यात बंदी कायम ठेवली आहे. अजूनही 31 मार्चनंतर बंदी उठवण्यात येईल की नाही? याबाबत साशंकता आहे. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी मोठा रोष आहे. कांदा पीक घ्यावे की नाही? अशा विवंचनेत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये आजमितीला दररोज काही लाख क्विंटल आवक होत असताना, केवळ 50 हजार टन कांदा निर्यातीला परवानगी न देता कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णतः उठवावी, अशी मागणी देखील या रथयात्रेच्या माध्यमातून आपण करत असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या रथयात्रेतून होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!