Onion Subsidy : कांदा अनुदानाचा नवीन जीआर; वाचा… कोणाला मिळणार संपूर्ण अनुदान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी जानेवारी महिन्याच्या मध्यावधीत कांदा दरात (Onion Subsidy) मोठी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष पाहता राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार यापूर्वी काही अनुदान वितरित करण्यात आले. मात्र, अजूनही काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान मिळालेले नव्हते. त्यानुसार आता राज्य सरकारने चौथ्या टप्प्यातील 211 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा (Onion Subsidy) शासन निर्णय राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

कांदा अनुदान योजना? (Onion Subsidy New GR)

राज्य सरकारने मागील वर्षी घोषित केलेल्या या कांदा अनुदान (Onion Subsidy) योजनेसाठी प्रति शेतकरी 200 क्विंटल कांदा विक्रीची मर्यादा निश्चित केली होती. तर फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांची अट ठेवण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांना पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी 10-10 हजार रुपयांचे अनुदान वितरण केले होते. तर तिसऱ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी 4 हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली होती. अर्थात आतापर्यंत प्रति शेतकरी 24 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिले असल्याचे राज्य सरकारने आपल्या जीआरमध्ये म्हटले आहे.

कोणाला मिळणार संपूर्ण अनुदान?

2023 यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने कांदा अनुदानासाठी एकूण 301 कोटी 66 लाख 93 हजार रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात देण्यासाठी मंजूर केले होते. त्यापैकी 211 कोटी 66 लाख रुपयांचा कांदा अनुदान निधी वितरित करण्यास राज्य सरकारने या जीआरच्या माध्यमातून मान्यता दिली आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या 200 क्विंटल कांद्यासाठी अनुदान जाहीर झाले आहे. मात्र सध्या ज्यांच्या कांदा अनुदानाची रक्कम 44 हजाराच्या आत आहे. अशा शेतकऱ्यांना आधीचे 24 हजार वगळून, आता 20 हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची कांदा अनुदान रक्कम 44 हजार रुपये आहे, अशा शेतकऱ्यांना चौथ्या टप्प्यात संपूर्ण कांदा अनुदान मिळणार आहे. असे जीआरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर

(https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402081809525102.pdf)

error: Content is protected !!