हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या लुबाडणूक (Online Cow Buffalo) होण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला डेअरी व्यवसाय करताना ऑनलाईन गाय किंवा म्हैस घेण्याच्या फंदात शक्यतो पडू नये. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील अविनाश पुरुषोत्तम बोरकर या शेतकऱ्याची ऑनलाईन गाय खरेदीमध्ये 18 हजार रुपयांची फसगत झाली. अशातच आज हरियाणा राज्यातील गुडगाव येथील दूध उत्पादक शेतकऱ्याकडून 22 हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. गुडगाव येथील डेयरी फार्मचे संचालक (Online Cow Buffalo) असलेले सुखबीर सिंह यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली असून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.
बहाण्याने उकळतात पैसे (Online Cow Buffalo Farmers)
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील अविनाश पुरुषोत्तम बोरकर यांनी ऑनलाईन गाय खरेदीसाठी (Online Cow Buffalo) जयपूर येथील अज्ञात व्यक्तीसोबत संपर्क साधला होता. विशेष म्हणजे अविनाश बोरकर हे भूमिहीन आहे. वारंवार अनेक पद्धतीने बहाणे करून ठगबाजांनी त्यांच्याकडून एकूण 18 हजार रुपये उकळले होते. अविनाशने आपल्या नजीकच्या मूल पोलिसात सायबर क्राईमची तक्रार नोंदवली आहे. तर आजच्या घटनेत एकूण चारवेळा गुडगाव येथील डेयरी फार्म संचालक असलेले सुखबीर सिंह यांच्याकडून एकूण 22 हजार रुपये हडप करण्यात आले. त्यांनी याप्रकरणी गुडगाव सायबर क्राईम ब्रँचकडे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अलीकडेच मीडिया रिपोर्ट नुसार झारखंड राज्यातील देवघर येथील एका महिलेला देखील गायीचे फोटो दाखवत, जवळपास 49,920 रुपयांना लुबाडण्याचा आले होते.
कशी होते लुबाडणूक?
प्रामुख्याने सोशल मीडियावर किंवा मग अन्य माध्यमातून आकर्षक दूध देणाऱ्या गायीचे फोटो प्रसारित केले जाते. शेतकरी असे गायींचे फोटो पाहून भाळतात. आणि गाय खरेदीसाठी विचार करतात. नेमकी तिथेच शेतकरी जाळ्यात अडकतात. त्यांना 50 हजाराची गाय कमी किमतीत सांगून आमिष दाखवले जाते. शेतकरी फसवणूक करणाऱ्यासोबत व्यवहार करून बसतात. हे ठगबाज प्रामुख्याने प्रत्येक घटनेत राजस्थान या राज्यातील असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे व्यवहार झाल्यानंतर ते सुरुवातीला काही पैसे मागतात. सामान्य शेतकरी विचार न करता पैसे देऊन बसतात. पुन्हा काही कारणास्तव पैसे मागितले जातात. गाय घरपोच पाठण्याचे सांगितले जाते. त्यात मग अन्य पैसे आमच्या गाडी ड्रायव्हरकडे द्या. असे सांगून विश्वास संपादन करतात. असे करत-करत शेवटी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा आमिषांना बळी पडू नये.