हॅलो कृषी ऑनलाईन : सर्वच क्षेत्रांमध्ये डिजिटल क्रांती (Online Farming Sale) होत आहे. अशातच आता महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल ऑनलाईन विक्री करता यावा. यासाठी सरकारी पातळीवरून सुरक्षिततेसह डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने यासाठी ‘महा ॲग्रो’ ॲपचे लॉन्चिंग केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या शेतमालासह, उत्पादित वस्तू ऑनलाईन विक्री (Online Farming Sale) करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
पोस्ट विभागासोबत सामंजस्य करार (Online Farming Sale For Farmers)
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या अँपचे लोकार्पण करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी ऑनलाईन विक्री केलेल्या शेतमाल (Online Farming Sale), फळे, भाजीपाला, डाळी किंवा अन्य सर्वच वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय पोस्ट विभाग यांच्यात सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे. देशात सध्या सर्वच ठिकाणी वस्तूंची ऑनलाईन खरेदी-विक्री तसेच ऑनलाईन पेमेंट होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना देखील या डिजिटल क्रांतीचा फायदा मिळवून देण्याचा या माध्यमातून सरकारचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
कोणाला होणार फायदा?
राज्य सरकारच्या या ॲपच्या माध्यमातून प्रामुख्याने पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी, बचत गट, स्वयं सहाय्यता गट, स्टार्टअप, लहान मोठे व्यावसायिक व शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने व शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार आहे. विशेष म्हणजे या अँपच्या माध्यमातून वस्तू पोहचवण्याचे काम पोस्ट विभाग करणार असल्याने, ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी हा अत्यंत विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येणार आहे. असेही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
1370 उत्पादने उपलब्ध
दरम्यान, अँपच्या लोकार्पणाच्या पहिल्याच दिवशी 358 उत्पादकांची 1370 उत्पादने राज्य सरकारच्या “Maha Agro Mart” या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर या ॲपवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान खात्याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच राज्य सरकारच्या कृषी व पणन महामंडळामार्फत विविध प्रकारच्या कृषी मालाचे रोजचे बाजारभाव देखील या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.