गटशेतीमार्फत गावातच तयार केले भाजीपाला विक्री करण्याचे मॉडेल; शेतकरी वर्गासाठी ठरतेय दिशादर्शक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । करोना कालावधीत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यांचेपीक तर येते आहे पण ते विकायचे कसे हा त्यांच्यापुढील मोठा प्रश्न. तर या प्रश्नाला एक चांगले उत्तर मिळवून दिले आहे ते म्हणजे, गोळेगाव येथील पल्लवी आणि गणेश हांडे यांनी! काही वर्षांपूर्वी यांचा संबंध भाजीपाला ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीसोबत आला. आणि, ते त्या कंपनीला भाजीपाला पुरवठा करू लागले. त्याचवेळी त्यांच्या मुंबईत असणाऱ्या भाच्याने काही स्थानिक ग्राहक मिळवले आणि त्यांना 1-2 किलोच्या पॅकिंग मध्ये भाजीपाला पुरवायला सुरुवात केली. हळू हळू ग्राहक संख्या आणि इतर कंपनी सोबत संपर्क वाढला.

काही वर्षांपूर्वी गो फॉर फ्रेश ह्या कंपनी ने त्यांच्या शेताला भेट दिली आणि त्यांना नियमित भाजीपाला पुरवठ्याची विनंती केली. ही संधी लक्षात घेता त्यांनी त्यांच्या गावात शेतकरी गट उभा केला ज्याद्वारे त्यांनी सेंद्रिय भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. आणि सेंद्रिय भाजीपाला कंपनीला पुरविण्यास सुरुवात केली. हळू हळू शेतकरी गट वाढत गेला. सध्या 20 शेतकरी 50 एकर जागेवर दिवसाला 60 हजारांची उलाढाल करतात.

शेतकऱ्यांना वेगवेगळा भाजीपाला नेमून दिला असतो त्यानुसार ते चक्री पद्धतीने पीक घेतात. बाजार समितीत भाजीपाल्याचा जो सरासरी भाव असतो त्याच्या 10% जास्त भाव शेकऱ्याला दिला जातो. हा भाव एका महिन्यासाठी फिक्स असतो. मग त्यात कितीही उतार चढाव झाले तरी शेतकऱ्याला मिळणारा भाव फिक्स असतो. कंपनीला भाजीपाला पुरवण्यासाठी गावातील 2 तरुणांनी गाड्या घेतल्या आणि ते कंपनीला शेतकऱ्यांचा माल पुरवू लागले. अशाप्रकारे आपण देखील आपल्या गावात शेतकरी गट उभारून हा प्रयोग करू शकतात आणि स्वतःसह इतर शेतकऱ्यांचा फायदा करू शकतात. आणि शेतीव्यतिरक्त देखील रोजगार निर्मिती करू शकतात.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7

Leave a Comment

error: Content is protected !!