Online Registration for Sale of Paddy: शेतकर्‍यांना धान विक्रीसाठी करावी लागेल आधी नोंदणी! ‘ही’ आहेत गडचिरोली जिल्ह्यासाठी धान खरेदी केंद्रे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: धानाची विक्री करण्यासाठी आधी ऑनलाईन नोंदणी (Online Registration for Sale of Paddy) करणे शेतकर्‍यांना बंधनकारक असणार आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या (Tribal Development Corporation) आधारभूत किंमत खरेदी धान व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामात धान (Paddy Purchase) व मक्याची (Maize Purchase) खरेदी करण्यात येणार आहे. धान खरेदीसाठी 93 तर मका खरेदीसाठी तीन केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी (Online Registration for Sale of Paddy) करणे बंधनकारक आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजने (Minimum Support Price Scheme) योजनेंतर्गत यंदाच्या रबी हंगामात (Rabi Season) अंतर्गत खरीप व रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान / भरड धान्य (Millets) आदिवासी विकास महामंडळास विक्रीकरिता नोंदणीस सुरुवात करण्यात आली आहे. गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कायार्लयांतर्गत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया (Online Registration for Sale of Paddy) पार पडणार आहे. त्यामुळे जिल्हा भरातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.

आदिवासी विकास महामंडळातील गडचिरोली प्रादेशिक कार्यक्षेत्रांतर्गत 54, तर अहेरी कार्यक्षेत्रांतर्गत 39 असे एकूण 93 धान खरेदी केंद्रास (Paddy Purchase Center) मंजूरी प्रदान करण्यात आली असून, 15 ते 30 एप्रिलपर्यंत धान विक्री नोंदणी करता येणार आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान नोंदणी व विक्रीकरिता ई-पीक पेरा नोंदणी, ई-केव्हायसी प्रमाणपत्र, चालू हंगामाचा सातबारा 30 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी (Online Registration for Sale of Paddy) करावी. तसेच मका खरेदीसाठी कुरखेडा, धानोरा व मार्कंडा ता. चामोर्शी हे तीन खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी संबंधित खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे यांनी केले आहे.

गतवर्षी 28 हजार क्विंटल मका खरेदी (Online Registration for Sale of Paddy)

गतवर्षी 2022-23 च्या रबी हंगामात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आधारभूत केंद्रांवरून मक्याची खरेदी करण्यात आली. गतवर्षीच्या रबी हंगामात एकूण 28 हजार 283 क्विंटल इतका मका खरेदी करण्यात आला. गेल्या पाच- सहा वर्षांपासून कुरखेडा, धानोरा, चामोर्शी तालुक्यात मका पिकाची लागवड वाढली आहे. यावर्षीच्या रबी हंगामात मका खरेदीसाठी कुरखेडा, धानोरा, मार्कडा कं. असे तीन केंद्र आहेत.

गतवर्षी पावणे दोन लाख क्विंटल धान खरेदी (Online Registration for Sale of Paddy)

गतवर्षी 2022-23 या रबी हंगामात महामंडळाच्या वतीने आधारभूत किमतीनुसार धानाची खरेदी करण्यात आली. गतवर्षी रबी हंगामात 1 लाख 81 हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या वर्षीसुद्धा आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, देसाईगंज या चार तालुक्यासह अहेरी उपविभागातही उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी चांगले उत्पादन होणार असल्याने धान खरेदीचा (Online Registration for Sale of Paddy) आकडा वाढणार आहे.

error: Content is protected !!