गडचिरोली जिल्ह्यातील जांभळांची ऑनलाईन विक्री सुरु; दहापट जास्त भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | यंदाच्या हंगामातील गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळ ऑनलाइन पद्धतीने विक्रीला शुभारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी जांभळांना दहा पटीने जास्त दर मिळाल्यामुळे शेतकरी आनंदी झाला. महाराष्ट्र शासनाच्या ‘पिकेल ते विकेल’ या उपक्रमांतर्गत जांभळाची ऑनलाईन विक्री सुरू करण्यात आली आहे. व सुरुवातीच्या दिवसांमध्येच याला चांगला प्रतिसादहि मिळत आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये जांभळाचे चांगले उत्पादन घेतले जाते. दरवर्षी जांभळांना दहा रुपये किलोने दर मिळतात. मात्र यावर्षी ऑनलाईन विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे शंभर रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदी आहे. वंदना ऍग्रो फार्म प्रोड्युसर या कंपनीमार्फत जांभळाची ऑनलाईन विक्री करण्यात आली. सुरवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे शेतकरी आता आशादायी झाला असून यापुढेही ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यासाठी उत्साही झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी जांभळाच्या ऑनलाइन विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. जांभळाच्या उत्पादनासाठी गडचिरोली जिल्ह्याचे नाव प्रसिद्ध बनवण्याचा त्यांनी ध्यास घेतला असल्याचे, त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सोबतच, ‘जांभळाच्या विक्रीमधून आदिवासी बांधवांना शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!