Orange Export : संत्रा निर्यातीस 50 टक्के अनुदान; हंगाम संपल्यावर सरकारचा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी संत्रा निर्यातीसाठी (Orange Export) 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु हे अनुदान कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांना देणार याबाबत कोणत्याही स्पष्टता नव्हती. याच मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाने लक्ष्यवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न (Orange Export) उपस्थित केला होता. त्यावर बोलताना राज्यातील संत्रा निर्यातीवर 50 टक्के अनुदान देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तारांनी सोमवारी (ता.18) विधानसभेत दिली आहे.

आर्थिक मदत देण्याची मागणी (Orange Export 50 Percent Subsidy)

राज्यातील संत्रा निर्यात अनुदानासाठी मागील आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 169 कोटी 60 लाख रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. असेही सत्तार यांनी यावेळी सभागृहाला सांगितले आहे. बांग्लादेश संत्रा आयात शुल्कात प्रति किलो 88 रुपयांपर्यंत वाढ केल्यामुळे राज्यातील संत्रा उत्पादकांना निर्यातीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे संत्रा निर्यात कमी झाली आहे. त्यावरून विधानसभेत विरोधीपक्षाने हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सत्तार बोलत होते. मात्र आता संत्रा हंगाम संपला आहे. त्यामुळे निर्यात अनुदान दिल्याने त्याचा आता शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. सरकारने थेट संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 600 कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि रोहित पवार यांनी केली आहे.

लवकरच बैठक घेणार

यावर बोलताना सत्तार यांनी संत्रा निर्यात केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय (Orange Export) आहे. मात्र राज्य सरकारच्या वतीने राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाची बैठक घेतली जाईल. राज्य सरकारने संत्रा निर्यातवर 50 टक्के अनुदान देण्यासाठी व्यापाऱ्यांना 169 कोटी 60 लाख रुपये खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. असेही सत्तार यांनी यावेळी म्हटले आहे.

विरोधकांचा हल्लाबोल

याशिवाय सरकारने संत्रा प्रकिया उद्योग आणि अद्ययावत सुविधा 40 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. संत्र्याचा हंगाम अजून संपलेला नाही. त्यामुळे निर्यात अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल. असे सत्तार यांनी यावेळी म्हटले आहे. तर आम्ही शेतकऱ्यांच्या संत्रा निर्यातीबद्दल प्रश्न विचारला आहे. तुम्ही एक पेटी संत्रीचे सांगत आहात. हंगाम संपल्यानंतर राज्य सरकारने अनुदान जाहीर केले आहे. आत्तापर्यंत सरकार काय झोपले होते का? असा थेट सवालही देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

error: Content is protected !!