Orange Export: बांगलादेशने वाढविलेल्या आयात शुल्काने, नागपूरी संत्र्याची निर्यात रोडवली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बांगलादेशच्या एका निर्णयाने नागपूरी (Orange Export) संत्र्याची निर्यात कमी झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या (Unseasonal Rain) आघातानंतर आता हे नवीन संकट संत्रा उत्पादक शेतकर्‍यांसमोर (Orange Growing Farmers) उभे राहिले आहे. बांग्लादेश सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. या निर्णयामुळे संत्र्याची निर्यात (Orange Export) घटली आहे.

महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन (Orange Production) होते. बांगलादेशमधून(Bangladesh) त्याला मोठी मागणी आहे. संत्रा उत्पादक गेल्या वर्षीपर्यंत दररोज 6,000 टन संत्री बांगलादेशला पाठवत होते. पण आता बांगलादेशच्या एका निर्णयाने ही निर्यात रोडवली आहे. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी सरकारने या मुद्याकडे लक्ष द्यावे अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.

आयात शुल्क वाढवले (Import Duty On Orange Increases)

बांग्लादेशने आयात शुल्क (Import Duty) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष 2019 मध्ये 20 रुपये प्रति किलोग्रॅम असे आयात शुल्क होते. ते गेल्या नोव्हेंबर महिन्यात वाढविण्यात आले. हे शुल्क आता 88 रुपये प्रति किलोग्रॅम करण्यात आले आहे. या निर्णयाचा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. आयात शुल्क चौपट झाल्याने शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे निर्यात (Orange Export) घटली आहे.

शेतकर्‍यांचे नुकसान (Orange Export)

विदर्भातील शेतकरी (Vidarbha Farmer) या निर्णयाने नाराज आहेत. भारताने बांगलादेशात मसाले, कांदा आणि अन्य उत्पादन पाठविण्यावर बंदी लादल्याने त्याचा बदला म्हणून बांगलादेशने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. केंद्र सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) लागू केली होती. त्यात आता सूट देण्यात आली आहे. बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहरीन, मॉरीशस आणि श्रीलंकेला कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. बांगलादेशला आता कांद्याचा पुरवठा (Onion Supply) करण्यात येत असल्याने संत्र्यावरील आयात शुल्क कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

बांगलादेशात संत्र्यांची मागणी जास्त का असते? (Orange Export)

बांगलादेशी जेवणानंतर नागपूरी संत्र्याचा (Nagpur Orange) आस्वाद घेतात. अन्न पचवण्यासाठी आणि तंदुरूस्तीसाठी संत्रे आरोग्यासाठी चांगले असल्याचा दावा शेतकरी करतात. पोटाला आराम देण्यासाठी बांगलादेशी संत्र्याचा (Orange Export) उपयोग करत असल्याचे सांगण्यात येते.

सरकारने उचललेले पाऊल

वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी डिसेंबर महिन्यात लोकसभेत ही बाब मान्य केली होती. बांगलादेशने आयात शुल्क वाढविल्याने भारताच्या संत्रा निर्यातीवर (Orange Export)परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले होते. भारताने आयात शुल्क वाढीचा फेरविचार करण्याची विनंती बांगलादेशाला केल्याची माहिती गोयल यांनी दिली होती.

error: Content is protected !!