Orange Farming : संत्री उत्पादकांच्या अडचणी कमी होणार; झालाय मोठा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वातावरणातील बदल, बाजारभावात (Orange Farming) अनिश्चितता आणि साठवणुकीसाठी अत्याधुनिक सुविधा नसल्याने, सध्या राज्यातील संत्री उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. मात्र, आता संत्रा उत्पादकांच्या या अडचणी कमी करण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पुढे आले आहे. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादक संघांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता वाशीम जिल्ह्यासह विदर्भातील सर्वच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या (Orange Farming) अडचणी वेळोवेळी समोर येण्यास मदत होणार आहे.

कशी आली कल्पना समोर? (Orange Farming Producers Difficultie)

मागील काही काळापासून राज्यातील संत्रा उत्पादक (Orange Farming) शेतकऱ्यांना पिकाबाबत शास्त्रीय सल्ला, योग्य मार्गदर्शन, शीतगृहासारख्या आधुनिक उपकरणांची कमतरता असल्यामुळे संत्रा उत्पादकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस संत्री पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची कोणतीही गॅरंटी नाही. हीच बाब लक्षात घेऊन आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यासांठी, काही संत्रा उत्पादक शेतकरी समोर आले आहे.

योग्य दरास मदत होणार

वाशीम जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादक संघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रमुख गावांमध्ये शेतकऱ्यांचे समूह तयार केले जाणार आहे. त्यासाठी तालुक्याचे प्रतिनिधी प्रमुख असतील, जे संत्रा उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचे सदस्य असणार आहे. हा संघ प्रामुख्याने शेतकर्यांकडून नोंदणी करत आपला विस्तार करणार आहे. तर संघाकडून संत्रा उत्पादनासाठी तंत्रज्ञान, मार्केट रिसर्च, प्रक्रिया केंद्र, मार्केटिंग सिस्टिम आदी विषयांवर संघाकडून योजना बनवली जाणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक उत्पादनासह आणि चांगला दर मिळण्यास होणार आहे.

शेतकऱ्यांना तज्ज्ञांचा सल्ला

दरम्यान, वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादक (Orange Farming) संघ स्थापन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. ज्यास सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक विलास शिंदे हे देखील उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना संत्री पिकासाठी बाजार तयार करण्याचा सल्ला दिला आहे. तर समूह शेती क्षेत्रातील डाॅ. भगवान राव यांनी या शेतकऱ्यांना द्राक्ष आणि इतर पिकांच्या समूहांप्रमाणे समूह स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील श्रमजीवी फार्मर प्रोड्यूसर्स कंपनीचे रमेश जिचकर यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कंपनी उभारून, संत्रा प्रक्रिया केंद्र सुरु करण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!